NASA Europa Send Your Name eSakal
विज्ञान-तंत्र

NASA Europa : गुरू ग्रहावर पाठवता येणार तुमचं नाव, कायमचं राहणार कक्षेत! नासाच्या अनोख्या मोहिमेत अशी करा नोंदणी

NASA X Post : मानव गुरू ग्रहावर पोहोचणं शक्य नसल्याचं नासाने स्पष्ट केलं आहे.

Sudesh

Europa Clipper : भविष्यात मानव चंद्रावर किंवा मंगळावर वस्ती करू शकतो असं आतापर्यंत कित्येक जणांनी म्हटलं आहे. नासा, इस्रो, स्पेस एक्स अशा कित्येक अंतराळ संशोधन संस्था यादृष्टीने प्रयत्न करत आहेत. यापुढेही जाऊन आपल्या सूर्यमालेतील इतर ग्रहांवर आपण वस्ती करू शकतो का? असा प्रश्नही लोकांना पडतो.

गुरू ग्रहावर माणूस कधी पोहचू शकतो का? असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल; तर तुमच्यासाठी वाईट बातमी आहे. आपण गुरू ग्रहावर पोहोचणं शक्य नसल्याचं नासाने स्पष्ट केलं आहे. मात्र, गुरू ग्रहाच्या कक्षेत तुम्ही आपलं नाव नक्कीच पाठवू शकता असंही नासाने म्हटलं आहे. भारतातून आतापर्यंत सुमारे 72 हजार लोकांनी यात आपलं नाव नोंदवलं आहे.

नासाची खास ऑफर

यावेळी नासाने आपली एक खास ऑफर दिली आहे. नासा 2024 मध्ये गुरू ग्रहाच्या एका चंद्रावर आपलं यान पाठवणार आहे. युरोपा क्लिपर अशा नावाची ही मोहीम असणार आहे. गुरू ग्रहाच्या युरोपा नावाच्या बर्फाळ चंद्राचा अभ्यास करण्यासाठी हे यान जाईल. या यानासोबत तुम्ही आपलं नाव पाठवू शकता.

या मोहिमेत आपलं नाव नोंदवण्यासाठी नासाने आपल्या एक्स पोस्टमध्ये एक लिंक देखील दिली आहे. या लिंकवर क्लिक करून तुम्ही 'मेसेज इन अ बॉटल' मोहिमेत सहभागी होऊ शकता.

स्वप्नं पाहणं थांबवू नका

आपल्या पहिल्या एक्स पोस्टमध्ये नासाने मानव कधीच गुरू ग्रहावर पोहोचणार नसल्याचं म्हटलं होतं. यानंतर दुसऱ्या एका पोस्टमध्ये लगेच त्यांनी याबाबत दिलगिरी देखील व्यक्त केली. आपण नेहमीच अंतराळाचा शोध घेत राहणार आहोत, आणि आम्ही सर्वांना असं करण्यासाठी प्रेरणा देऊ इच्छितो. स्वप्नं पाहणं थांबवू नका. अशा आशयाची पोस्ट नासाने केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कफ सिरपमध्ये ब्रेक ऑइलचं विषारी केमिकल, किडनी निकामी होऊन १४ मुलांचा मृत्यू; औषधावर घातली बंदी

Latest Marathi News Live Update: 7 ऑक्टोबर पर्यंत पावसाचा इशारा

Kolhapur Cricket : कोल्हापुरच्या पोरी महाराष्ट्राच्या क्रिकेट संघाच करणार नेतृत्व, टी-२० च्या कर्णधारपदी अनुजा पाटील

Salary Report 2025: भारतीयांच्या मासिक पगारात वाढ, केंद्र सरकारची आकडेवारी जाहीर, तुमचा ७ वर्षांत किती पगार वाढला?

Pune Murder News : पुण्यात पहाटे खुनाचा थरार! तरुणाच्या डोक्यात दगड घालून हत्या; कुठं घडली घटना?

SCROLL FOR NEXT