Sunita Williams Conduct Plant Watering Experiments in iis Space Station  esakal
विज्ञान-तंत्र

Sunita Williams Update : पृथ्वीवर राहून शास्त्रज्ञांना जे जमलं नाही ते सुनीता विल्यम्सने अंतराळात करून दाखवलं; काय केली कमाल?

Sunita Williams Research : अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्था NASAच्या अंतराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) सध्या भारतीय वंशाची सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे दोन अंतराळवीर अडकून आहेत.

Saisimran Ghashi

NASA Update : अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्था NASAच्या अंतराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) सध्या भारतीय वंशाची सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे दोन अंतराळवीर वास्तव्यास आहेत. येथे येण्यासाठी त्यांचे स्टारलाइनर हे अंतराळयान जूनच्या सुरुवातीला आले होते. पण यानामध्ये काही तांत्रिक अडचणींमुळे ते अजूनही पृथ्वीवर परत आलेले नाहीत. या वेळेच्या पुरेपूर वापर करत या अतिरिक्त वेळेत सुनीता विल्यम्स अंतराळात रोपट्यांना कशाप्रमाणे पाणी द्यावे यावर संशोधन करत आहेत.(water plants growing without soil)

अंतराळातील भारविहीन अवस्थेत रोपट्यांच्या मुळांना पाणी कसे मिळते यावर ते प्रयोग करत आहेत. त्यासाठी विविध आकारांच्या रोपट्यांचा आणि वेगवेगळ्या पाणी वाहिणीच्या पद्धतींचा अभ्यास केला जात आहे. या संशोधनामुळे अंतराळात भविष्यात निर्माण होणाऱ्या अंतराळ स्थानकांवर रोपटी वाढवणे सोपे होईल.

सुनिता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी अंतराळवीर बुच विलमोर हे 5 जून रोजी अंतराळ स्थानकावर केले होते. बोईंग स्टारलाइनर या अंतराळयानातून त्यांनी अवकाश स्थान झेप घेतली होती परंतु या यामध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्याचे लक्षात आल्यानंतर सुनीता विल्यम्स परती रद्द करण्यात आली. फक्त आठ-दहा दिवसांसाठी अंतराळ स्थानकावर गेलेल्या या अंतराळवीरांना तब्बल दीड महिना अंतराळ स्थानकात कैद होऊन राहावे लागले आहे.

बोईंग स्टारलाइनर या यानांमध्ये हेलियमची गळती झाल्याचे निदर्शनास आले. नासाच्या म्हणण्यानुसार जोपर्यंत हा तांत्रिक बिघाड पूर्णपणे दूर केला जात नाही तोपर्यंत या अंतराळवीरांना पृथ्वीवर आणण्याबाबत कोणताही निर्णय घेतला जाणार नाही. तसेच त्यांच्या जीविताला हानी होईल असं कोणतीही कृत्य केले जाणार नाही. सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी अंतराळवीर यांनी नासाने आयोजित केलेल्या लाईव्ह व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे पृथ्वीशी संवाद साधला.त्यादरम्यान त्यांनी अवकाश स्थानकातील स्थितीबद्दल खुलासा केला आणि हे यान आम्हाला लवकरच परत घेऊन येईल असे असा विश्वास दाखवला.

दरम्यान नासावर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विलमोर यांना जाणीवपूर्वक बिघाड झालेल्या यानातून अवकाश स्थानकावर पाठवण्यात आल्याचे आरोप जागतिक स्तरावर झाले. नासाला यानाच्या तांत्रिक बिघाडाची पूर्वकल्पना होती तरीही त्यांनी सुनीता विल्यम्स यांना अंतराळात का पाठवले असा प्रश्न उपस्थित केला जात होता नाशाने या सर्व आरोपांचे खंडन करत सुनिता विल्यम्स अंतराळात सुखरूप असल्याचे सांगितले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's first bullet train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT