Nasa Ghost Hand 
विज्ञान-तंत्र

Nasa Halloween : नासाला अंतराळात मिळाला 'भुताचा हात'; हॅलोवीन निमित्त शेअर केला खास फोटो!

Nasa Ghost Hand : नासाने आपल्या एक्स (ट्विटर) हँडलवरुन हा फोटो पोस्ट केला आहे.

Sudesh

अमेरिकेतील हॅलोवीन उत्सव 31 ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात आला. या उत्सवात लहान मुलं भुतांप्रमाणे वेशभूषा करून फिरतात, आणि "आम्हाला ट्रीट द्या अन्यथा आम्ही तुम्हाला घाबरवू" असं म्हणून इतरांकडून खाऊ मिळवतात. यानिमित्ताने नासाने देखील अंतराळातील एका फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये 'भुताचा हात' दिसतो आहे.

नासाने आपल्या एक्स (ट्विटर) हँडलवरुन हा फोटो पोस्ट केला आहे. नासाच्या चंद्र एक्स रे आणि IXPE स्पेस टेलिस्कोपने हा फोटो क्लिक केला आहे. यामध्ये एक तारकासमूह दिसतो आहे, ज्याचा आकार हाताच्या पंजाची हाडे असावीत असा आहे. यामुळेच याला भुताचा हात देखील म्हटलं जात आहे.

हा हात खरंतर Pulsar Wind या नेब्युलाचा ग्लोइंग गॅस आहे. एका महाकाय ताऱ्याच्या मृत्यूनंतर झालेल्या विस्फोटामुळे हा गॅस तयार झाला आहे. यामधील धुलिकणांनी असा विशिष्ट आकार धारण केला आहे. हा स्फोट सुमारे 1,500 वर्षांपूर्वी झाला होता असं वैज्ञानिकांनी म्हटलं आहे. ही नेब्युला पृथ्वीपासून सुमारे 16,000 प्रकाशवर्षे दूर आहे. या नेब्युलामधील पल्सर हा तारा हाताच्या तळव्याच्या अगदी मध्ये आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबई सुरक्षेत चौथ्‍या स्‍थानावर! ‘राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण’चा अहवाल; सर्वाधिक गुन्हेगारी कोणत्या शहरात?

मुसळधार पावसाचा हाहाकार! पूल कोसळून ६ जणांचा मृत्यू, भूस्खलनामुळे रस्ते बंद

Kolhapur News : देवीची मूर्ती मंडपात; साउंडची ईर्ष्या चौकात, पोलिसांनी काठ्यांनी मारलं तरीही बारा तासांहून अधिक काळ मंडळांनी अडवले रस्ते

Latest Marathi News Live Update: शेतकर्‍यांना आज मदतीची गरज- शरद पवार

Kolhapur Tragedy : क्लासमध्ये ओळख, मैत्रिणीला कोल्हापुरातून उचललं; पंढरपुरात ४ दिवस कोंडलं, कोकणात नेलं पण तिथून पळून गेली अन्...

SCROLL FOR NEXT