NASA Martian Job eSakal
विज्ञान-तंत्र

NASA Mars Simulator : मंगळ ग्रहावर राहण्यासाठी नासा शोधतंय उमेदवार; एक वर्षाच्या नोकरीसाठी मिळणार भरमसाठ पगार!

NASA Mars Mission : मंगळावर जाण्याच्या दृष्टीने आता नासानेही मोठं पाऊल उचललं आहे. क्रू हेल्थ अँड परफॉर्मन्स एक्स्प्लोरेशन अ‍ॅनालॉग (CHAPEA) असं या मिशनचं नाव असणार आहे.

Sudesh

NASA volunteers to simulate Mars mission : चंद्रावर पाऊल ठेवल्यानंतर कित्येक वर्षांपासून माणूस दुसऱ्या ग्रहावर देखील उतरण्याचा प्रयत्न करत आहे. स्पेस-एक्सचे मालक इलॉन मस्क तर मंगळ ग्रहावर संपूर्ण वस्तीच उभारण्याच्या प्रयत्नात आहेत. मंगळावर जाण्याच्या दृष्टीने आता नासानेही मोठं पाऊल उचललं आहे. यासाठी आता नासा व्हॉलेंटियर्सच्या शोधात आहे.

मीडिया रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, नासाने एका अनोख्या नोकरीची (NASA Job) घोषणा केली आहे. या नोकरीमध्ये नासा उमेदवारांना मंगळ ग्रहावर राहण्याचं ट्रेनिंग देणार आहे. सोबतच यासाठी मोठ्या प्रमाणात पगारही देण्यात येणार आहे. क्रू हेल्थ अँड परफॉर्मन्स एक्स्प्लोरेशन अ‍ॅनालॉग (CHAPEA) असं या मिशनचं नाव असणार आहे. (NASA Mars Experiment)

पृथ्वीवरच मंगळ ग्रहाचा अनुभव

या नोकरीसाठी नासा उमेदवारांना खरोखर मंगळ ग्रहावर पाठवणार नाही. तर, मंगळ ग्रहावर ज्याप्रमाणे वातावरण आहे, तसंच वातावरण नासाने पृथ्वीवरील एका घरामध्ये तयार केलं आहे. या विशेष घराला नासाने 'सिम्युलेटेड मार्स हॅबिटॅट' (Simulated Mars Habitat) असं नाव दिलंय. 1700 स्क्वेअर फूट मोठ्या या घरामध्ये चार लोक राहू शकतात.

स्पेस वॉकची मजा अन् प्रयोग

या घरामध्ये चार जणांना सुमारे एक वर्षापर्यंत रहावं लागेल. यामध्ये त्यांना स्पेसवॉक करण्याची संधीही मिळेल. तसंच त्यांना मंगळावर असणाऱ्या वातावरणात शेती करावी लागणार आहे. सोबतच विविध प्रकारचे प्रयोग याठिकाणी करावे लागणार आहेत. भविष्यात जेव्हा नासा मंगळावर स्पेस स्टेशन उभारेल, तेव्हा या सर्व डेटाचा भरपूर फायदा होणार आहे. (NASA Mars Simulation)

नासाने दिलेल्या माहितीनुसार, ही मोहीम 2025 साली सुरू होईल. यासाठी अर्ज मागवण्यात आले असून, 2 एप्रिल ही अंतिम मुदत आहे. यासाठी अर्ज करणारी व्यक्ती अमेरिकेची नागरिक किंवा अमेरिकेतील रहिवासी असणं गरजेचं आहे. या उमेदवाराला इंग्रजी भाषा येणं गरजेचं आहे. तसंच ही व्यक्ती धूम्रपान करणारी नसावी, असंही नासाने स्पष्ट केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : कोकण, घाटमाथा, विदर्भात ‘ऑरेंज अलर्ट’; उर्वरित कोकण, विदर्भात जोरदार पाऊस शक्य

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

MS Dhoni Birthday: धोनी का आहे दिग्गज खेळाडू, याची साक्ष देणारे हे रेकॉर्ड्स माहित आहेत का?

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

SCROLL FOR NEXT