NASA Moon Rocket esakal
विज्ञान-तंत्र

NASA Moon Rocket : तब्बल ५० वर्षांनंतर चंद्रावर जाणार माणूस, नासाने लाँच केलं सगळ्यात मोठं रॉकेट

या अंतर्गत स्पेस लाँच सिस्टीम रॉकेट आणि ऑरियन कॅप्सूल ला ४२ दिवसांच्या मिशनवर चंद्राजवळ पाठवलं जाणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

NASA Moon Rocket : नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (NASA)ने आपल्या ड्रीम प्रोजेक्ट आर्टेमिस-1 मिशनला यशस्वीरित्या लाँच केलं आहे. नासाचा हा तिसरा प्रयत्न होता. या मिशनचं पहिले दोन वेळा लाँचिंग नाकारण्यात आलं होतं. यावेळीपण रॉकेटमधून हॅड्रोजन गळती होत असल्याने काहीवेळासाठी लाँचिंग थांबवण्यात आलं.

नासाच्या इंजिनिअर्सने या गळतीचं कारण नाही सांगितलं, पण यंदा ही कमतरता दूर करून यशस्वी लाँच करता आलं आहे. म्हणूनच नासासाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे. मागील दोन वेळापासून लाँचिंग फेल होत होतं. यंदा नासाने इंधन लाइनवरचा दबाव कमी केलं आणि सील मजबूत राहण्यासाठी इंधन भरण्याचा कालावधी साधारण एक तासाने वाढवला.

यानंतर असं लक्षात आलं की, ही युक्ती काम करत आहे. पण सहा तासांची प्रक्रीया संपताच थोड्या थोड्या वेळात हायड्रोजन गळती सुरू झाली होती. पण अखेर काही वेळापूर्वी यशस्वी लाँच करण्यात आलं. १९७२ नंतर आता चंद्रावर माणसाला पाठवण्याची तयारी केली जात आहे.

जर तीन आठवड्यांचं हे परिक्षण उड्डान यशस्वी झालं तर रॉकेट चालक दलाची एक रिकामी कॅप्सुल चंद्राच्या दिशेने एका मोठ्या कक्षेत नेला जाईल. त्यानंतर कॅप्सुल डिसेंबरमध्ये प्रशांत क्षेत्रात पृथ्वीवर येईल. या मिशनसाठी अनेक वर्षांची मेहनत, कोट्यावधीहून अधिक खर्चानंतर अंतराळ प्रक्षेपण प्रणालीच्या रॉकेटने कॅनडीयन स्पेस सेंटरहून उड्डान केलं.

ओरियन कॅप्सूलला रॉकेटच्या डोक्यावर ठेवण्यात आलं आहे. जो उड्डानानंतर दोन तासापेक्षा कमी वेळातच पृथ्वीची कक्षा पार करून चंद्राच्या दिशेने निघाला.

मिशन नासासाठी फार महत्वाचं

स्पेस लॉन्च सिस्टीम रॉकेट आणि ऑरियन कॅप्सूल ला ४२ दिवसांच्या मिशनवर चंद्राजवळ पाठवलं जाणार आहे. आर्टेमिसच्या माध्यामातून माणूस तब्बल ५० वर्षांनंतर चंद्रावर पुन्हा पाऊल ठेवणार असल्याने हे मिशन नासासाठी फार महत्वाचं होतं. नासाच्या आर्टेमिस मिशनचं ध्येय आहे की, २०२५ च्या सुरूवातीला पहिली महिला चंद्रावर पाठवण्याचं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर लागू झाल्यापासून केवळ २७ प्रमाणपत्रांचं वाटप; सरसकट आरक्षण नाहीच, दिशाभूल कोण करतंय?

Nashik Post : आनंदाची बातमी! टपाल विभागाकडून आता कॅनडा, अमेरिकेतही पोचणार दिवाळी फराळ!

Latest Marathi News Live Update : श्रीशैलममध्ये पंतप्रधान मोदींचं भव्य स्वागत

Health Care: निरोगी आरोग्यासाठी वर्षात दोनदा आरोग्य तपासणी करा, डॉक्टरांचा आरोग्यमंत्र

Chhagan Bhujbal : मंत्री छगन भुजबळ यांचा वाढदिवस 'ज्ञानोत्सव' म्हणून साजरा!

SCROLL FOR NEXT