Nasa Solar Flares eSakal
विज्ञान-तंत्र

Nasa Solar Flares : सूर्यावरील मोठ्या स्फोटांमुळे पृथ्वीवर आलं सौरवादळ; नासाने शेअर केले फोटो..

Solar Storm : यापूर्वी 2003 साली आलेल्या 'हॅलोवीन स्टॉर्म' या मोठ्या सौरवादळामुळे स्वीडनमध्ये ब्लॅकआउटची स्थिती निर्माण झाली होती.

Sudesh

Nasa Share Images of Solar Flare : तब्बल दोन दशकांतील सर्वात मोठ्या दोन सौरवादळांनी नुकतीच पृथ्वीला धडक दिली. शुक्रवार आणि शनिवार असे दोन दिवस सलग या वादळांचा तडाखा पृथ्वीला बसला. या वादळांचं कारण म्हणजे सूर्याच्या पृष्ठभागावर झालेले मोठे स्फोट! या दोन स्फोटांचे फोटो आता नासाने शेअर केले आहेत.

"10 आणि 11 मे रोजी दोन मोठ्या सौरवादळांचा तडाखा पृथ्वीला बसला. नासाच्या सोलार डायनॅमिक्स ऑब्जर्वेटरीने (Solar Dynamics Observatory) सूर्यावर झालेल्या स्फोटांचे फोटो क्लिक केले आहेत. यांना X5.8 आणि X1.5 या स्तरावरील फ्लेअर्स म्हणण्यात येत आहे." असं नासा सन अँड स्पेस या एक्स हँडलवरुन सांगण्यात आलं. या स्फोटांचे फोटोही या पोस्टमध्ये दिले आहेत.

सूर्याच्या कोरोना आवरणामध्ये प्लाझ्मा आणि चुंबकीय क्षेत्राचा मोठा स्फोट होऊन सौरवाळांची निर्मिती होते. यापूर्वी 2003 साली आलेल्या 'हॅलोवीन स्टॉर्म' या मोठ्या सौरवादळामुळे स्वीडनमध्ये ब्लॅकआउटची स्थिती निर्माण झाली होती. दक्षिण आफ्रिकेतही याचा मोठा फटका बसला होता. यावर्षी आलेल्या सौरवादळाबाबत देखील शास्त्रज्ञांनी जगभरात अलर्ट राहण्याचा सल्ला दिला होता.

सौरवादळांचा मोठा फटका हा अवकाशात असणाऱ्या उपग्रहांना सर्वाधिक बसतो. इलॉन मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचे कित्येक उपग्रह अवकाशात आहेत. या उपग्रहांवर प्रचंड दबाव पडला असून, आम्ही बऱ्याच काळापासून तग धरून आहोत असं मस्क यांनी म्हटलं.

'नॉर्दन लाईट्स'चे विहंगम दृश्य

या सौरवादळामुळे भारतातील लडाखसह युरोपातील बहुतांश देशांमध्ये नॉर्दन लाईट्स (Northen Lights) पहायला मिळाले. अमेरिका, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियाच्या आकाशामध्ये देखील विविध रंगांची उधळण पहायला मिळाली. हे सुंदर फोटो आणि व्हिडिओ कित्येकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: कोथरुडमधील आजी-आजोबांच्या वडापाव गाडीवर महापालिकेचा अन्याय, तोंडचा घास हिरावणारी कारवाई

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

Latest Maharashtra News Updates : "खरी लाचारी आज बघितली" उपमुख्यमंत्री शिंदेंनी जय गुजरात दिलेल्या घोषणेवर मनसे नेत्याची टीका

IND vs ENG 2nd Test: W,W,W,W,W! मोहम्मद सिराज ऑन फायर, बेन स्टोक्स गांगरला; इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत परतला

ती खूपच बारीक, काळी-सावळी... प्रियांका चोप्राला पहिल्यांदा पाहिल्यावर थक्क झालेली मराठी अभिनेत्री; म्हणाली- ती हिरोईन बनायला आलेली...

SCROLL FOR NEXT