NASA Frog  eSakal
विज्ञान-तंत्र

NASA Frog : रॉकेट लाँच करताना मध्येच बेडूक आला, अन्... नासाने फोटो शेअर करत सांगितला भन्नाट किस्सा!

Minotaur V Frog : या बेडकाला नेटिझन्सनी श्रद्धांजली वाहिली आहे.

Sudesh

रॉकेटचं लाँचिंग ही कोणत्याही अंतराळ मोहिमेसाठी अगदी महत्त्वाचा टप्पा असतो. यशस्वी प्रक्षेपण झाल्यानंतर शास्त्रज्ञांचा बराचसा ताण कमी होतो. त्यामुळेच काउंटडाऊन पासून, रॉकेट अपेक्षित कक्षेत पोहोचेपर्यंत वैज्ञानिक प्रक्षेपण यशस्वी झाल्याचं घोषित करत नाहीत.

अशातच प्रक्षेपणावेळी मध्येत काही अडथळा आल्यास, कित्येक वर्षांची मेहनत वाया जाण्याचा धोका असतो. मात्र काही वेळा रॉकेट लाँच होताना काही मजेशीर गोष्टीही होतात. नासाच्या एका रॉकेटच्या प्रक्षेपणावेळी देखील अशीच एक घटना घडली होती.

दहा वर्षांपूर्वी, आजच्याच दिवशी नासाचं LADEE हे रॉकेट लाँच झालं होतं. व्हर्जिनिया नासाच्या वालॉप्स फ्लाईट फॅसिलीटी या केंद्रावरून या रॉकेटचं प्रक्षेपण करण्यात आलं. यावेळी लाँच पॅडजवळ असणारा एक बेडूकही मध्ये आला होता. जवळच असणाऱ्या एका कॅमेऱ्याने रॉकेटसोबतच या बेडकाचाही फोटो टिपला.

नासाने आपल्या एक्स (ट्विटर) हँडलवरून हा फोटो शेअर केला आहे. "कधी तुम्ही रॉकेट असता, आणि कधी तुम्ही बेडूक असता" असं कॅप्शन नासाने या फोटोला दिलं आहे. रॉकेट वरती जाताना तयार झालेल्या प्रेशरमुळे जवळ असणारा हा बेडूकही हवेत उंच उडाला, आणि हाच क्षण शेजारी असणाऱ्या रिमोट कॅमेऱ्यात कैद झाला.

नेटिझन्सनी वाहिली श्रद्धांजली

नासाने आपल्या वेबसाईटवर देखील याबाबत माहिती दिली आहे. या बेडकाचं पुढे काय झालं, हे मात्र आपल्याला माहिती नसल्याचं नासाने म्हटलं आहे. नासाची याबाबतची एक्स पोस्ट चांगलीच व्हायरल होते आहे. या बेडकाचे कित्येक फॅन्सही असून, 'सुपरक्लस्टर' नावाच्या वेबसाईटने या बेडकाला श्रद्धांजली देखील वाहिली आहे.

या वेबसाईटवर नासाच्या कित्येक अंतराळवीरांची माहिती देण्यात आली आहे. यावर या बेडकाचं नाव 'Minotaur V Frog' असं देण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या बेडकाचा उल्लेखही एक अंतराळवीर म्हणून करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs RCB: सॉल्टपाठोपाठ रजत पाटिदारचंही वानखेडेवर घोंगावलं वादळ, मुंबई इंडियन्सविरुद्ध विक्रमी अर्धशतक; विराट कोहलीचाही रेकॉर्ड

Donald Trump: इस्लामाबाद चर्चा फसली! संतापलेले डोनाल्ड ट्रम्प आता काय करणार? इराणला कडक अल्टीमेटम देत पुढचा प्लॅन सांगितला

MI vs RCB: LORD Shardul मुंबई इंडियन्सच्या मदतीला धावला! चौकार - षटकारांचा पाऊस पाडणाऱ्या फिल सॉल्टचा काढला काटा

Nagpur Student End Life : 'माफ कर, मम्मी, तुझा मुलगा..' , बीसीएत शिकणाऱ्या मुलाने आईला चिट्टी लिहली अन्..., मित्राला फोन करून नको होत ते केलं

Aditi Tatkare Baramati : बारामतीत अदिती तटकरेंचे भावनिक आवाहन; “दादांचे मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न सुनेत्रा ताई पूर्ण करणार"

SCROLL FOR NEXT