Nasa's Starliner Mission Ready for June 5 After Two Scrubs esakal
विज्ञान-तंत्र

NASA Space Mission : सुनीता विल्यम पुन्हा अंतराळात झेप घेण्यासाठी सज्ज ; बाईंग स्टार लाईनचे उद्या पुनःप्रक्षेपण

Sunita Williams to Space : दोनवेळा प्रक्षेपण रद्द झाल्यानंतर तिसऱ्यांदा प्रक्षेपणाची नासा टीम सज्ज

सकाळ डिजिटल टीम

NASA : नासा आणि बोइंग आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थान केंद्र (ISS) अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि Butch Wilmore यांना घेऊन जाण्यासाठी तिसऱ्यांदा स्टारलाइनर अंतराळयान प्रक्षेपित करण्याच्या प्रयत्नात आहेत.

हे प्रक्षेपण ५ जून रोजी सकाळी ८:२२ वाजता (भारतीय वेळ) फ्लोरिडामधील केप कॅनावरल स्पेस फोर्स स्टेशनवरून युनायटेड लॉन्च अलायन्सच्या अत्याधुनिक अटलास व्ही राकेटद्वारे केले जाणार आहे. १ जूनला लाँच होणारं हे मिशन काही तांत्रिक कारणास्तव दुसऱ्यांदा रद्द करण्यात आलं होते.

यापूर्वी दोनदा प्रक्षेपणासाठी वेळ निश्चित करण्यात आली होती, परंतु तंत्र प्रणालीमध्ये आढळलेल्या अडचणींमुळे ती रद्द करावी लागली. ५ जून ही तारीख निश्चित झाली असून या वेळी सर्वकाही सुरळीत रीत्या पार पडेल अशी आशा आहे. हवामान अंदाजानुसार प्रक्षेपणासाठी ८०% अनुकूल परिस्थिती राहण्याची शक्यता आहे.

जर यशस्वी झाले तर, "कॅलिप्सो" नावाचे हे अंतराळयान प्रक्षेपणानंतर 24 तासांत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थान केंद्राशी जोडले जाईल. विल्यम्स आणि विल्मोर हे अंतराळवीर अंतराळयानाची चाचणी घेण्यासाठी ८ दिवस स्थान केंद्रावर राहणार असून त्यानंतर ते पृथ्वीकडे परत येतील. अमेरिकेच्या पश्चिम भागात त्यांचे जमिनीवर पॅराशूटच्या साहाय्याने नियंत्रित असे अवतरण होईल.

सुरक्षित अंतराळ प्रवासासाठी सर्व मापदंड पूर्ण करणे आवश्यक असल्यामुळे काही काळासाठी प्रक्षेपण रखडले असले तरी, ही अंतराळ मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्व टीम जोरदार तयारी करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT