NCPCR notice to YouTube India
NCPCR notice to YouTube India eSakal
विज्ञान-तंत्र

YouTube India : आई-मुलाच्या 'तशा' व्हिडिओंमुळे NCPCR भडकले, यूट्यूब इंडियाला पॉक्सोचं उल्लंघन केल्याबद्दल पाठवली नोटीस

Sudesh

YouTube India Notice : व्हिडिओ ब्रॉडकास्टिंग प्लॅटफॉर्म यूट्यूबच्या भारतातील युनिटसमोर मोठ्या अडचणी आल्या आहेत. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने (NCPCR) चक्क पॉक्सो कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप करत यूट्यूब इंडियाला नोटीस पाठवली आहे.

एनसीपीसीआरचे प्रमुख प्रियंक कानूनगो यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, की यूट्यूबवर सध्या असे हजारो व्हिडिओ उपलब्ध आहेत, ज्यामध्ये आई आणि (अल्पवयीन) मुलगा एकमेकांना लिपलॉक किस करत आहेत. अशा प्रकारच्या व्हिडिओंचं व्यावसायीकरण करणे म्हणजे पॉर्नला चालना देणं आहे. त्यामुळेच यूट्यूबला नोटीस पाठवण्यात आली आहे.

"अशा प्रकारच्या व्हिडिओंच्या माध्यमातून लहान मुलांना अब्यूज केलं जातं. अशा प्रकारचे अश्लील व्हिडिओ हे किशोरवयीन मुलांमधील उत्तेजनांना चालना देत आहे. भारतात हे चालणार नाही. यूट्यूबला यावर कारवाई करावीच लागेल", असंही प्रियंक पुढे म्हणाले.

आई-मुलाचं नातं पवित्र

आई आणि मुलाचं नातं अगदी पवित्र आहे. मात्र, अशा प्रकारच्या व्हिडिओंमध्ये या नात्याला चुकीच्या पद्धतीने दाखवलं जातं. हे स्पष्टपणे या लहान मुलांचं लैंगिक शोषण आहे. जर हे प्रकार थांबले नाहीत, तर NCPCR याप्रकरणी FIR देखील दाखल करेल. पुढे मग यूट्यूब इंडियाच्या अधिकाऱ्यांना तुरुंगात पाठवलं जाईल याचीही खबरदारी आम्ही घेऊ; असंही प्रियंक यांनी खडसावून सांगितलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT