Netflix  Sakal
विज्ञान-तंत्र

Netflix Jobs: नेटफ्लिक्स देतंय बंपर नोकरीची ऑफर! पगार ऐकून बसेल धक्का

Netflix Job Openings: जगातील अनेक मोठ्या कंपन्‍या आर्टिफिशियल इंटेलिजेंसचा अधिकाधिक वापर करत आहेत.

राहुल शेळके

Netflix Job Openings: आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा अनेक दिवसांपासून चर्चेचा केंद्रबिंदू आहे. त्याच्या बाजूने आणि विरुद्ध अनेक तर्कवितर्क दिले जात आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे मोठ्या प्रमाणावर लोकांच्या नोकऱ्या जातील अशी भीती व्यक्त केली जात आहे.

ही भीती कितपत खरी ठरते, हे येणारा काळच सांगेल, पण या आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे तुम्हाला मोठ्या पगाराची नोकरी नक्कीच मिळू शकते.

हॉलिवूडमध्ये एआयचा निषेध सुरू

Netflix या ऑनलाइन कंटेंट स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म चालवणाऱ्या कंपनीने अलीकडेच एक जागा भरली आहे. कंपनी AI प्रॉडक्ट मॅनेजर शोधत आहे.

आर्टिफिशियल इंटेलिजन्सबद्दल हॉलीवूडमध्ये प्रचंड विरोध होत असताना नेटफ्लिक्सने एआय प्रॉडक्ट मॅनेजरची जागा भरत आहे. हॉलिवूडच्या रायटर्स असोसिएशन आणि इतर संस्था मनोरंजन उद्योगातील आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि अल्गोरिदमवरील वाढत्या अवलंबित्वामुळे संतप्त आहेत.

एआय प्रॉडक्ट मॅनेजरची नोकरी

नेटफ्लिक्सच्या या जॉबसाठी कंपनी एआय प्रॉडक्ट मॅनेजरच्या पदासाठी 9 लाख डॉलर पर्यंत वार्षिक पगार देऊ करत आहे, जे सुमारे 7.4 कोटी रुपये आहे.

एआय प्रॉडक्ट मॅनेजरचे काम नेटफ्लिक्सच्या मशीन लर्निंग प्लॅटफॉर्ममध्ये सुधारणा करणे आणि कंटेंट तयार करण्यासाठी एआयचा वापर करणे हे असेल.

या पदासाठीही मोठा पगार

एआय प्रॉडक्ट मॅनेजर व्यतिरिक्त, नेटफ्लिक्सला आर्टिफिशियल इंटेलिजन्सशी संबंधित इतर लोकांची देखील आवश्यकता आहे. कंपनीने टेक्निकल डायरेक्टरची जागा भरली आहे.

या पदासाठी कंपनीकडून वार्षिक 4.5 लाख ते 6.5 लाख डॉलर्स पगाराची ऑफर दिली जात आहे. याचा अर्थ नेटफ्लिक्स एका वर्षात 3.70 कोटी ते 5.35 कोटी रुपये पगार टेक्निकल डायरेक्टरला देईल.

देश आणि जगातील अनेक मोठ्या कंपन्‍या आता आपल्‍या विविध कामांसाठी आर्टिफिशियल इंटेलिजेंसचा अधिकाधिक वापर करत आहेत.

मायक्रोसॉफ्ट आणि ओपनएआयच्या चॅटजीपीटी आणि गुगलच्या बार्डने जगाला नवीन तंत्रज्ञानाची ओळख करुन दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC Announced Prize for India : वर्ल्ड कप विजयाची ट्रॉफी अन् कोट्यवधीचं बक्षीस! भारतीय महिला क्रिकेटपटूंसाठी आयसीसीची मोठी घोषणा...

India won Women’s World Cup: दीप्ती शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड! भारतीय महिलांनी इतिहास रचला, रोहित शर्मा रडला; Video Viral

Amol Muzumdar: भारतासाठी खेळण्याची संधी मिळाली नाही, पण आता World Cup विजेता कोच; महिला संघाच्या यशामागचा हिरो

World Cup 2025: भारताच्या पोरीचं वर्ल्ड चॅम्पियन! फायनलमध्ये द. आफ्रिकेला पराभूत करत जिंकला पहिला वर्ल्ड कप

Women’s World Cup Final : २५ वर्षानंतर स्वप्नपूर्ती! भारतीय संघाच्या विजयाचे पाच टर्निंग पॉइंट्स... शफाली, दीप्ती अन् श्री चरणी...

SCROLL FOR NEXT