5G Smart Phone
5G Smart Phone sakal
विज्ञान-तंत्र

5G Smart Phone : किफायतशीर फाइव्ह-जी स्मार्टफोन

ऋषिराज तायडे

भारतात नुकतीच 5G सेवा सुरू झाली आणि अनेक कंपन्यांकडून नवनवीन 5G स्मार्टफोन लॉन्च केले जात आहे. अर्थात सर्वसामान्य ग्राहकांना ते परवडतीलच असे नाही. त्यामुळे सॅमसंगने परवडणाऱ्या दरातील सॅमसंग गॅलेक्सी A14 5G आणि गॅलेक्सी A23 5G हे दोन नवे स्मार्टफोन लॉन्च केले. त्याबाबत...

डिस्प्ले आणि डिझाईन

गॅलेक्सी A14 हा ६.६ इंची HD+ डिस्प्ले आणि ९० Hz रिफ्रेश रेट, तर गॅलेक्सी A23 हा स्मार्टफोन ६.६ इंची FHD+ डिस्प्ले आणि १२० Hz रिफ्रेश रेटसह सादर झाला. गॅलेक्सी A14 हा डार्क रेड,लाईट ग्रीन आणि ब्लॅक, तर गॅलेक्सी A23 हा सिल्व्हर, ऑरेंज आणि लाईट ब्ल्यू रंगात उपलब्ध झाला.

परफॉर्मन्स आणि स्टोरेज

मल्टिटास्किंग आणि वेगवान परफॉर्मन्ससाठी गॅलेक्सी A14 मध्ये एक्सिनोस 1330 ऑक्टा-कोर प्रोसेसर,तर गॅलेक्सी A23 मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसर देण्यात आले आहे. स्टोरेजच्याबाबतीत बोलायचे झाल्यास गॅलेक्सी A14 या स्मार्टफोनमध्ये ४ जीबी, ६ जीबी आणि ८ जीबी रॅम; तसेच ६४ जीबी आणि १२८ जीबी स्टोरेज दिले आहे, तर गॅलेक्सी A23 हा ६ जीबी आणि ८ जीबी रॅम; तसेच १२८ स्टोरेजसह उपलब्ध आहे.

कॅमेरा आणि फोटोग्राफी

दोन्ही स्मार्टफोनमध्ये अद्ययावत कॅमेरा फीचर आहे. गॅलेक्सी A14 मध्ये ५० मेगापिक्सलच्या मुख्य कॅमेऱ्यासह दोन मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर कॅमेरा, दोन मेगापिक्सलचा मायक्रो सेन्सर कॅमेरा आणि १३ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. गॅलेक्सी A23 मध्ये ५० मेगापिक्सलच्या मुख्य कॅमेऱ्यासह अल्ट्रावाईड, डेप्थ आणि मायक्रोलेन्स असा क्वाड कॅमेरा सेटअप आणि ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. गॅलेक्सी A23 मधील ओआयएस फीचरमुळे स्टेबल फोटोग्राफीचा अनुभव मिळतो.

बॅटरी आणि सुरक्षा

दीर्घकाळ बॅटरीलाईफच्या हेतूने गॅलेक्सी A14 आणि गॅलेक्सी A23 मध्ये अॅडाप्टिव्ह पॉवर सेव्हिंग मोडसह ५००० mAh बॅटरी देण्यात आली आहे. तसेच 25W चे वेगवान चार्जिंग सपोर्ट दिला आहे. गॅलेक्सी A23 मध्ये नॉक्स सिक्युरिटी सुटमुळे ग्राहकांना साडेतीन वर्षे सिक्युरिटी अपडेट्स दिले जाणार आहे, तर गॅलेक्सी A14 मधील प्रायव्हेट शेअर फीचरमुळे ग्राहकांना ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या मदतीने फोटो, व्हिडीओ; तसेच अन्य डेटा सुरक्षितरित्या शेअर करता येतो. यामध्ये चार वर्षांचे सिक्युरिटी अपडेट्स दिले जाणार आहेत.

किंमत

गॅलेक्सी A14 5G

८ जीबी+ १२८ जीबी : २०,९९९

६ जीबी+१२८ जीबी : १८,९९९

४ जीबी + ६४ जीबी : १६,४९९

गॅलेक्सी A23 5G

८ जीबी+१२८ जीबी : २४,९९९

६ जीबी+ १२८ जीबी : २२,९९९

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ghatkopar hoarding: घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडेला उदयपूरमधून अटक

Swati Maliwal: स्वाती मालिवाल प्रकरण तापणार; दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल

'जिरेटोप देणाऱ्याला डोकं नाही अन् घालून घेणाऱ्यालाही डोकं नाही'; उद्धव ठाकरेंचा भर पावसात हल्लाबोल

CM Eknath Shinde : त्यांच्यासोबत पाकिस्तानची बोली बोलणारे बसतात; एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांना टोला

SRH vs GT Live Score : हैदराबादमध्ये पुन्हा पावसाचं थैमान; नाणेफेकच काय सामन्यावरही दाटले ढग

SCROLL FOR NEXT