New Body Organ  
विज्ञान-तंत्र

नव्या मानवी अवयवाचा शोध

वृत्तसंस्था

लंडन - मानवी देहाची रचना त्याची निर्मिती आणि त्याचे कार्य या अतिशय जटिल अशा प्रक्रिया आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून यावर अविरत शोध सुरू असून, आता आयरिश शास्त्रज्ञांच्या एका चमूला मानवी देहात एक नवीन अवयव सापडला आहे. त्याला त्यांनी मेसेंट्री असे नाव दिले असून, मराठीत त्याला "अंत्रधर' असे म्हणता येईल.

गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या पचन संस्थेमध्ये हा अवयव असल्याचे मत शास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहे. यापूर्वी तो वेगवेगळ्या घटकांनी बनला असून, त्याची विस्कळित रचना असल्याचे मानले जात होते; परंतु हा अवयव उदरपोकळीच्या मागच्या भित्तीला आतड्यांशी जोडण्याचे कार्य करतो. लिमरिक विद्यापीठाचे प्राध्यापक आणि या संशोधनातील प्रमुख संशोधक जे. कॅल्व्हिन कॉफी यांनी याबाबतची माहिती "द लॅन्सेट गॅस्ट्रॉएंट्रोलॉजी अँड हेप्टॉलॉजी' या नियतकालिकात प्रसिद्ध केली आहे.

अंत्रधर ही एक घडी असून ती पोट, छोटे आतडे, स्वादुपिंड, प्लिहा आणि अन्य अवयवांना उदराच्या भिंतीला जोडते. शोधादरम्यान हा एक अखंड अवयव असल्याचेही शास्त्रज्ञांच्या निदर्शनास आले आहे. अंत्रधराच्या आणखी अभ्यासामुळे काही शस्त्रक्रिया करण्याची गरज भासणार नाही; तसेच गुंतागुंती कमी होण्यास व रुग्ण लवकर बरा होण्यासही मदत होईल, असे मत कॉफी यांनी नोंदविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPO Alert: NSE सह 5 IPO येणार! कोणता IPO देऊ शकतो सर्वाधिक Listing Gain? NSE IPO चा GMP किती?

सारखेनंतर आता ताटातली पोळीही महाग; एका महिन्यात गव्हाच्या दरात तब्बल २०० रुपयांची वाढ

Ganesh Chaturthi 2026: आपण गणपती बाप्पा म्हटलं की ‘मोरया’ का म्हणतो? या जयघोषामागे आहे एका गणेशभक्ताची कहाणी

Marathi News Live Updates : भुसावळमध्ये संत गाडगेबाबा कॉलेजच्या बाप्पाची ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक

Ganesh Chaturthi 2026: बाप्पाच्या चरणांशी उंदीर का असतो? उंदीर मामा कसा बनला गणपती बाप्पाचे वाहन? जाणून घ्या रंजक कथा!

SCROLL FOR NEXT