New Kia Seltos Facelift Model know Waiting Period bookings and price marathi auto news  
विज्ञान-तंत्र

KIA Seltos Facelift: सेल्टॉसच्या फेसलिफ्ट व्हर्जनसाठी किती आहे वेटिंग पीरियड? जाणून घ्या तुमच्या शहरानुसार माहिती

Kia Seltos waiting period: आज आपण या नवीन किया सेल्टॉस फेसलिफ्ट मॉडेलचा वेटिंग पीरियड आणि किंमतीबद्दल जाणून घेणार आहोत.

रोहित कणसे

भारतातील सर्वात लोकप्रिय मध्यम आकाराच्या SUV पैकी एक किया सेल्टॉस (Kia Seltos) एक आहे. ही कार अत्यंत स्टायलिश डिझाइन आणि अनेक दमदार फीचर्समुळे ग्राहकांच्या चांगलीच पसंतीस उतरत आहे.

दरम्यान नुकतेच किआ इंडियाने सेल्टोसच्या फेसलिफ्टेड आवृत्तीचे अनावरण केले, ज्यामध्ये अनेक बदल आणि अपडेट्स देण्यात आले आहेत. आज आपण या नवीन किया सेल्टॉस फेसलिफ्ट मॉडेलचा वेटिंग पीरियड आणि किंमतीबद्दल जाणून घेणार आहोत.

नवीन किया सेल्टॉस (Kia Seltos) फेसलिफ्ट मॉडेलची किंमत ऑगस्ट 2023 मध्ये घोषित केली जाईल. मात्र, तुम्ही कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर किंवा ऑफलाइन तुमच्या जवळच्या किया डीलरशीपला भेट देऊन 25,000 रुपयांच्या टोकन रकमेवर ऑनलाइन प्री-बुक करू शकता. नवीन सेल्टोस फेसलिफ्टसाठी 14 जुलै 2023 पासून बुकिंग सुरू झाली आहे.

कियाने एक अनोखा K-Code उपक्रम सुरू केला आहे. याचा वापर करून तुम्ही वेटिंग पीरियड टाळून अगदी सहज कार खरेदी शकता. या K-Codeचा वापर करून खरेदीदारांना प्राधान्याने गाडीची डिलीवरी मिळू शकते.

नवीन किया सेल्टॉस SUV खरेदी करू इच्छिणाऱ्या कुटुंबियांना किंवा मित्रांनाही तुम्ही K-कोड देऊ शकता. सेकंड-हँड सेल्टोस मालक देखील या उपक्रमाचा भाग भाग होण्यासाठी पात्र आहेत.

ऑगस्ट 2023 पासून, किया सेल्टॉस डिलीव्हरी सुरू होईल. तुम्ही कोणती गाडी खरेदी करता आणि तुम्ही कुठे राहता यावर ती किती वेळेत मिळेल हे अवलंबून असेल.

गाडीच्या डिलीव्हरीसाठीचा कालावधी दोन ते सहा महिन्यांदरम्यान असू शकतो. जुलै 2023 पर्यंत विविध आवृत्त्या आणि शहरांसाठी अंदाजे वेटिंग पीरीयड किती असू शकतो त्याबद्दल जाणून घेऊया.

कियाच्या HTK 1.5 Petrol MT आणि HTK+ 1.5 Petrol iMT, या व्हेरियंटसाठी ग्राहकांना पुणे अंदाजे दोन महिने आणि मुंबई शहरात तीन महिने वाट पाहवी लागणार आहे. तर HTK+ 1.5 Diesel MT हे व्हेरिएंट तुम्हाला पुण्यात तीन तर मुंबईत चार महिन्यात डिलीव्हर केले जाईल.

HTX 1.5 Petrol MT, HTX+ iMT Dark Edition (Matte), HTX+ iMT Dual Tone, GTX+ DCT Dual Tone, GTX+ DCT Dark Edition (Matte) आणि X-Line Turbo Petrol DCT हे व्हेरिएंट पुण्यात तीन महिन्यात तर HTK+ 1.5 Diesel AT या व्हेरियंटसाठी चार महिन्यांचा कालावधी लागू शकतो.

मुंबईबद्दल बोलायचे झाल्यास किया सेल्टॉसच्या HTK+ 1.5 Diesel AT या व्हेरियंटसाठी सर्वाधिक 5 महिने तर HTX 1.5 Petrol MT, HTX+ iMT Dark Edition (Matte), HTX+ iMT Dual Tone, GTX+ DCT Dual Tone, GTX+ DCT Dark Edition (Matte) आणि X-Line Turbo Petrol DCT या व्हेरिएंटसाठी तब्बल तीन महिने वेटिंग पीरीयड आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video : समोरा समोर दोन बसची भयानक टक्कर; अपघाताचा थरारक व्हिडिओ व्हायरल, पाहून शॉक व्हाल..

IND vs ENG 2nd Test : रवींद्र जडेजाने 'तलवार' उपसली! कपिल देव यांचा विक्रम मोडला, Sobers सारख्या दिग्गजांसोबत जाऊन बसला

Latest Maharashtra News Updates : महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेकडून बाळासाहेब लांडगे यांचं निलंबन

बाबा वेंगाचं भाकीत खरं ठरणार? पुढच्या 6 महिन्यात 'या' 4 राशी करोडपती होणार? कोणत्या त्या राशी जाणून घ्या...

Pune Accident: बसची वाट बघत उभे होते, तेव्हाच टेम्पो काळ बनून आला अन्..., दोघांचा जागीच मृत्यू, घटनेने पुण्यात खळबळ

SCROLL FOR NEXT