Mahindra XUV400 2024
Mahindra XUV400 2024  eSakal
विज्ञान-तंत्र

Mahindra XUV400 2024 : महिंद्राने लाँच केली नवी इलेक्ट्रिक एसयूव्ही! नेक्सॉनला देणार का शॉक?

Sudesh

Mahindra Electric SUV : देशातील अग्रगण्य वाहन उत्पादक कंपनी असणाऱ्या महिंद्राने नवीन वर्षाची अगदी इलेक्ट्रिक अशी सुरुवात केली आहे. कंपनीने शुक्रवारी आपल्या Mahindra XUV400 या इलेक्ट्रिक एसयूव्हीचं नवं व्हर्जन लाँच केलं. यामध्ये कित्येक बदल करण्यात आले आहेत. यामुळे मागील व्हर्जनपेक्षा हे मॉडेल अधिक तगडं होणार आहे.

या कारचा लुक आणि डिझाईन हे बऱ्यापैकी जुन्याच मॉडेलप्रमाणे आहे. अर्थात याच्या डॅशबोर्डमध्ये नवीन फीचर्स देण्यात आले आहेत. सोबतच यात 10.25 इंच फ्लोटिंग टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टीम दिली आहे. या कारमध्ये ड्युअल झोन क्लायमेट कंट्रोल, वायरलेस फोन चार्जर, अ‍ॅलेक्सा कनेक्टिव्हिटी असे फीचर्सही दिले आहेत. (XUV400 new model)

परफॉर्मन्स

या कारमध्ये जुन्या मॉडेलप्रमाणेच फ्रंट अ‍ॅक्सेल माउंटेड इलेक्ट्रिक मोटर देण्यात आली आहे. ही मोटर 150hp पॉवर आणि 310Nm टॉर्क जनरेट करते. सर्व चाकांना डिस्क ब्रेक, रिजनरेटिंग ब्रेकिंग आणि तीन ड्राईव्ह मोड असे फीचर्स या कारमध्ये दिले आहेत. ही कार 8.3 सेकंदांमध्ये 100 Kmph एवढा वेग पकडते, तर याचा टॉप स्पीड 150 Kmph असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

या कारच्या EC Pro व्हेरियंटमध्ये 34.5kWh क्षमतेची बॅटरी दिली आहे. तर EL Pro च्या बेस व्हेरियंटमध्येही अशीच बॅटरी मिळते, तर टॉप व्हेरियंटमध्ये 39.4kWh क्षमतेची बॅटरी मिळते. ईसी प्रो व्हेरियंट एका चार्जमध्ये 375 किलोमीटर धावू शकते, तर ईएल प्रो व्हेरियंटची रेंज 456 किलोमीटर आहे असा दावा कंपनीने केला आहे. इएल प्रोच्या दोन्ही व्हेरियंटमध्ये 7.2kW AC चार्जर दिला आहे.

सेफ्टी

XUV400 च्या नव्या मॉडेलमध्ये 6 एअरबॅग, ईएसपी, टीपीएमएस, ऑटो डिमिंग यांसह कित्येक सेफ्टी फीचर्स दिले आहेत. यामध्ये IP67 रेटेड वॉटरप्रूफ बॅटरी पॅक देण्यात आला आहे. क्रूज कंट्रोल, रिअर व्हू्यू कॅमेरा, इलेक्ट्रिक सनरुफ असेही फीचर्स यामध्ये आहेत.

ही कार महिंद्राने 15.49 लाख ते 17.49 लाख या इंट्रोडक्टरी किंमतीवर लाँच केली आहे. ही किंमत 31 मे 2024 पर्यंत लागू असणार आहे. यानंतर या कारची किंमत वाढू शकते.

व्हेरियंटनुसार किंमत

  • XUV400 EC Pro : यामध्ये 34.5kWh बॅटरी आणि 3.3kW AC चार्जर मिळतो. याची एक्स शोरूम किंमत 15,49,000 रुपये आहे.

  • XUV400 EL Pro : यामध्ये 34.5kWh बॅटरी आणि 7.2kW AC चार्जर मिळतो. याची एक्स शोरूम किंमत 16,74,000 रुपये आहे.

  • XUV400 EL Pro : यामध्ये 39.4kWh बॅटरी आणि 7.2kW AC चार्जर मिळतो. याची एक्स शोरूम किंमत 7,49,000 रुपये आहे.

या कारची बुकिंग (XUV400 EV Booking) सुरू झाली असून, तुम्ही ऑनलाईन किंवा अधिकृत डीलरकडे ही कार बुक करू शकता. यासाठी 21 हजार रुपये टोकन अमाउंट द्यावी लागणार आहे. 1 फेब्रुवारीपासून या कारची डिलिव्हरी सुरू होईल. याची थेट टक्कर टाटाच्या नेक्सॉन या इलेक्ट्रिक कारशी असणार आहे. त्यामुळे ईव्ही रेसमध्ये कोणती कार लोकप्रिय ठरते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Politics: विधानसभेपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होणार? बंडखोर ठाकरे-पवारांकडे परतणार?

Election Commission : ''सिस्टीममध्ये कुठलीही चूक होऊ शकत नाही'', मतमोजणीच्या तयारीबद्दल मुख्य आयुक्त राजीव कुमार म्हणाले...

Priyanka Chopra Beauty Tips: चमकदार त्वचेसाठी देसी गर्लने शेअर केली बॉडी स्क्रब बनवण्याची सोपी पद्धत

Bengluru Viral Video : बंगळुरूमध्ये कोकोनट अटॅकरची दहशत ; भरदिवसा गाडी फोडली, व्हायरल होतोय व्हिडीओ

मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीचा कळंबा कारागृहात खून; नेमकं काय घडलं? मृतदेह स्वीकारण्यास पत्नीचा का नकार?

SCROLL FOR NEXT