MPSC  Sakal
विज्ञान-तंत्र

MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांचा संघर्ष लवकरच दिसणार पडद्यावर

MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थांच्या व्यथा वेगळ्या माध्यमातून प्रेक्षकांच्या समोर येणार

दत्ता लवांडे

MPSC करणारे विद्यार्थी म्हणलं की आठवते ती पुण्यातील नवी पेठ आणि क्लासेस, लायब्ररीत असणाऱ्या मुलामुलींचा लोंढा. जिल्हाधिकारी, तहसीलदार, तलाठी, पोलीस अधिकारी बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून कौटुंबिक, सामाजिक आणि आर्थिक अशा कित्येक अडचणींचा सामना करत पुण्यामुंबई सारख्या शहरात खेड्यातील विद्यार्थी आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी येतात.

काही विद्यार्थी वयाची तीशी ओलांडली तरीही प्रयत्न सोडत नाहीत. अशातचं आरोग्य भरतीच्या परिक्षेतील झालेल्या गोंधळासारखा घोटाळा होऊन सरकार विद्यार्थांच्या भावनांशी खेळतयं का? असे प्रश्न निर्माण होतात पण आतापर्यंत या विद्यार्थांच्या प्रश्नावर कुणीच का बोलत नसावं?

याच MPSC करणाऱ्या विद्यार्थांच्या प्रश्नावर भाष्य करणारा 'MPSC...The Struggle'हा चित्रपट लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. द ग्रिन इंडीया प्रा. लि.च्या बॅनरखाली सचिन डोईफोडे, सतिश सांडभोर व योगेश राजपूत यांनी हा चित्रपटाची निर्मीती केली असून सचिन डोईफोडे यांनी या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन केले आहे. कोरोनासंदर्भातील सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करत 'MPSC...TheStruggle चित्रपटाचे 'चित्रीकरण यशस्वीपणे पूर्ण करण्यात आल्याची माहिती दिग्दर्शक सचिन डोईफोडे आणि सतिश सांडभोर यांनी दिली आहे. या चित्रपटात प्रमुख भुमिका करमाळ्याचे गणेश मोरे यांची असून सोबत लातुरची प्रणिता शिंदे यांनी नायिकेचे काम केले आहे.

महाराष्ट्रातील आजकालच्या तरूण पिढीला स्पर्धा परिक्षा देताना खुप अडचणी येतात. या सर्व विषयावर भर देण्याच काम या चित्रपटात केले आहे. लवकरच हा चित्रपट आपल्या जवळच्या चित्रपटगृहात पाहायला मिळणार आहे. सचिन बन्सीधर डोईफोडे यांचा 'झाड' नंतर हा दूसरा चित्रपट असल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT