मागील काही महिन्यांपासून भारत-चीन सीमावाद मुद्दा चांगलाच गाजतोय. भारताने चीनला सीमेवर शह दिलाच होता, आता भारताने चीनवर 'डिजीटल स्ट्राईक' देखील केला आहे. बुधवारी भारताने चीनच्या 118 अॅपवर बंदी घातली होती, यात भारतात प्रसिध्द असणारे गेमिंग अॅप पबजीचाही सामावेश आहे. यापुर्वीही भारताने चीनच्या 59 अॅपवर बॅन केलं होतं. या डिजीटल स्ट्राईकमुळे आता चीन जागा झाला असून काल चीनने यावर पहिल्यांदाच प्रतिक्रियाही दिली होती. आता भारतात पबजी अॅपच्या बॅननंतर सोशल मिडियावरही मोठ्या प्रमाणात मीम्स पसरत आहेत. पबजीला अॅडीक्ट झालेल्या लोकांची आता चांगलीच निराशा झालेली दिसते. पण आता भारतीयांसाठी पबजीच्या बॅन नंतरही काही चांगले पर्याय असून पबजीसारखेच अजून गेमिंग अॅप आहेत त्याबद्दलची माहिती आपण या लेखात घेऊया.
1. बॅटललँड्स रोयाल (कंपनी - फ्यूचरप्ले )-
हा एक मल्टीप्लेयर गेम असून वेगवेगळ्या थीम्स देखील यामध्ये निवडता येतात. एकावेळी ३२ जण हा गेम खेळू शकतात.
2. फोर्टनाईट (कंपनी - एपिक गेम्स )-
बॅटल रॉयल युद्ध श्रेणीतील ही एक गेम असून यात वेगवेगळे मोड दिले आहेत. या गेम मध्ये दरवाजे, छप्पर, सिलिंग, रॅम्प अशा गोष्टी बांधाव्या लागतात.
देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
3. कॉल ऑफ ड्युटी मोबाईल (कंपनी - टीमी स्टुडिओज )-
बॅटल रॉयल युद्ध श्रेणीतील ही एक गेम असून पबजीला एक उत्तम पर्याय आहे. यामध्ये अनेक गेम मोड्स दिले असून १०० खेळाडूचे बॅटलग्राउंड, स्नायपर विरुद्ध स्नायपर, झॉम्बी मोड, ५ विरुद्ध ५ डेथमॅच
4.पिक्सेलस् अननोन बॅटलग्राउंड (कंपनी - अझूर गेम्स )-
बॅटल रॉयल युद्ध श्रेणीतील या गेममध्ये साधे ग्राफिक्स असून तीन गेम मोड आहेत. सिंगल, टीम, झॉम्बी असे तीन मोड उपलब्ध आहेत.
जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
5.गरेना फ्री फायर (कंपनी - ३डॉट्स स्टुडिओज )-
या बॅटल रॉयल युद्ध श्रेणीतील गेममध्ये ५० खेळाडू एका बेटावर १० मिनिट खेळू शकतात. हा खेळ सोप्पा आणि जलद आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.