PS5 Digital Edition eSakal
विज्ञान-तंत्र

PS5 Digital : 'प्लेस्टेशन-5'चं नवीन 'डिजिटल एडिशन' व्हर्जन समोर, खरंच उपयोगी की नुसताच खर्च?

PlayStation 5 Digital Edition : डिजिटल एडिशनमध्ये 1TB ऑन-बोर्ड स्टोरेज देण्यात आलं आहे.

Sudesh

सोनीने आपल्या सर्वात जास्त खपाच्या गेमिंग कन्सोलचं नवीन व्हर्जन समोर आणलं आहे. प्लेस्टेशन-5 डिजिटल एडिशन असं या कन्सोलचं नाव आहे. हे PS5 चं आणखी स्लिम आणि अ‍ॅडव्हान्स व्हर्जन असल्याचं सांगण्यात येत आहे.

नवीन PS5 हे अधिक स्लिम आहे. जुन्या PS5 च्या तुलनेत हा 30 टक्के कमी जागा व्यापत असल्याचं कंपनीने सांगितलं आहे. आकार कमी झाला असला, तरी त्याची स्टोरेज कपॅसिटी वाढवण्यात आली आहे. जुन्या PS5 मध्ये 825GB ऑन-बोर्ड स्टोरेज होतं, तर डिजिटल एडिशनमध्ये 1TB ऑन-बोर्ड स्टोरेज देण्यात आलं आहे.

PS5 Digital Edition कन्सोल हे नोव्हेंबरपासून अमेरिकेत उपलब्ध होणार आहेत. तर, पुढे टप्प्या-टप्प्याने ते जगभरात उपलब्ध होतील असं कंपनीने स्पष्ट केलं. स्टँडर्ड मॉडेलची किंमत अमेरिकेत 499.99 डॉलर्स एवढी आहे. तर डिजिटल एडिशनची किंमत 449.99 डॉलर्सना एवढी आहे. (Gaming News)

यूजर्सचा खर्च वाढणार?

खरंतर डिजिटल एडिशन मॉडेल हे सुमारे 50 डॉलर्सने स्वस्त आहे. मात्र, त्यामध्ये डिस्क ड्राइव्ह देण्यात आलेली नाही. यूजर्सना डिस्क ड्राइव्ह हवी असल्यास ती 79.99 डॉलर्स किंमतीला वेगळी विकत मिळेल. यासोबतच डिजिटल एडिशनसाठी कॉम्पॅटिबल असणारं व्हर्टिकल स्टँड हेदेखील 29.99 डॉलर्स किंमतीला वेगळं विकत घ्यावं लागणार आहे. त्यामुळे यूजर्सचा खर्च वाढणार असल्याचं म्हटलं जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT