Elon Musk Sakal
विज्ञान-तंत्र

Twitter Update: जानेवारी २०२३ मध्ये इलॉन मस्क देणार मोठे गिफ्ट, ट्विटरवर येणार 'हे' खास फीचर

जानेवारी २०२३ मध्ये ट्विटर नवीन फीचर लाँच करणार आहे. या फीचरची माहिती स्वतः इलॉन मस्क यांनी दिली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Twitter New Features: मायक्रो ब्लॉगिंग वेबसाइट ट्विटरने काही दिवसांपूर्वीच आपली पेड सबस्क्रिप्शन सर्व्हिस Twitter Blue ला लाँच केले आहे. याशिवाय, कंपनीने अनेक नवीन शानदार फीचर्स देखील आणले आहेत. अब्जाधीश इलॉन मस्क यांच्याकडे ट्विटरची मालकी आल्यापासून प्लॅटफॉर्मवर अनेक बदल पाहायला मिळत आहेत. आता कंपनी यूजर्सला नवीन वर्षाचे गिफ्ट देणार असून, लवकरच शानदार फीचर्स लाँच करणार आहे.

इलॉन मस्क यांनी स्वतः Twitter या नवीन फीचरबाबत माहिती दिली आहे. जानेवारी २०२३ मध्ये ट्विटरमध्ये नवीन नेव्हिगेशन फीचर येणार आहे. या नेव्हिगेशन फीचरच्या मदतीने तुम्ही रिकॉमेंडेड, फॉलो ट्विट आणि अन्य टॉपिकच्या कॉन्टेंटला सहज पाहू शकता.

इलॉन मस्क यांनी ट्विट करत माहिती दिली की, जानेवारी महिन्यात ट्विटरवर नेव्हिगेशन फीचर येणार आहे. या फीचरच्या मदतीने रिकॉमेंडेड, फॉलो ट्विट आणि अन्य कॉन्टेंटला पाहता येईल. ट्विटरच्या AI मध्ये अनेक बदल केले जातील.

हेही वाचा: Inside Online Dating : हुक अप्स, ओपन रिलेशनशिप्स की...; महाराष्ट्रातील तरुणाई नक्की काय शोधते?

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच ट्विटरच्या जवळपास ४० कोटी यूजर्सचा डेटा लीक झाला होता. हॅकर्सद्वारे डेटाची डार्क वेबवर विक्री केली जात आहे. चोरी झालेल्या डेटामध्ये यूजर्सचे नाव, ईमेल आयडी, फॉलोअर्स संख्या आणि मोबाइल नंबरचा समावेश आहे. लीक डेटामध्ये भारतीय माहिती व प्रसारण मंत्रालय आणि नासाच्या अकाउंटच्या माहितीचा देखील समावेश आहे.

हेही वाचा: Smartphone Offer: फक्त 5 हजारात मिळतोय 5000mAh बॅटरीसह येणारा पॉवरफुल स्मार्टफोन, ऑफर एकदा पाहाच

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karnataka Politics: डीके शिवकुमार CM बनण्याआधीच कर्नाटकमध्ये प्रेशर पॉलिटिक्स! दलित-लिंगायत समाजाकडून मोठी मागणी, काँग्रेससमोर नवी डोकेदुखी

Mahur Renuka Devi Temple: माहूर गडावरील श्री रेणुका देवीला आंब्याची आरास; अधिक महिन्यात भाविकांची मोठी गर्दी

Baramati Sugarcane Farming: पणदरेत ‘ऊस शेतीची नवी दिशा’ परिसंवादाला उत्स्फूर्त प्रतिसाद; एकरी १०० टन ऊस उत्पादनासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शक दिशा

Chakan Onion Price Row: कांदा दरप्रश्नी चाकण बैठक की राजकीय आखाडा? शेतकरी संघटनेच्या नेत्यांत वाद

Pune Toxic Liquor: पुणे-पिंपरीतील विषारी दारूकांडाचा उगम उरुळीकांचन? स्थानिक तरुणाचा मृत्यू, भेसळ रॅकेटवर संशय तीव्र

SCROLL FOR NEXT