Roadlark Electric Cycle
Roadlark Electric Cycle esakal
विज्ञान-तंत्र

सिंगल चार्जमध्ये १०० किमी धावणारी Roadlark Electric सायकल

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : इलेक्ट्रिक मोबिलिटीच्या सेगमेंटमध्ये आताही सिंगल चार्जमध्ये १०० किमी किंवा त्यापेक्षा जास्त धावणारी इलेक्ट्रिक स्कूटर किंवा मोटारसायकल लाँच करण्याचे ट्रेंड पाहायला मिळत आहे. मात्र आता Nexzu Mobility ने पहिली अशी इलेक्ट्रिक सायकल लाँच केली आहे जी सिंगल चार्जमध्ये पूर्ण १०० किमीपर्यंत धावते. नेक्सझू मोबिलिटीने आपली नवीन रोडलार्क इलेक्ट्रिक सायकल (Roadlark Electric Bicycle)लाँच केली आहे. त्यात ५.२ एएचची एक बॅटरी नेहमी सायकलमध्ये असेल. दुसरीकडे ८.७ एएचची बॅटरीला काढूनही चार्ज केले जाऊ शकते. याने ही सायकल सिंगल चार्जमध्ये १०० किमीपेक्षा जास्त लांब जाऊ शकते. ही सायकल २५ किमी प्रतितास टाॅप-स्पीडने धावू शकते. बॅटरी तीन ते चार तासांमध्ये फुल चार्ज होऊ शकते.

फिचर्स

- नेक्सझू रोडलार्क इलेक्ट्रिक सायकलमध्ये ग्राहकांना ना केवळ जास्त दूरपर्यंत रेंज मिळेल, तसेच त्यात एबीएससह ड्युअल डिस्क ब्रेकही असल्याने चालवणे आणखीन सोपे होते. त्याबरोबरच बॅटरीवर चालवण्यासह पॅडल असिस्टही दिले गेले आहे. दुसरीकडे होम डिलिव्हरी सेगमेंटला आकर्षित करण्यासाठी कंपनीने नेक्सझू रोडलार्कचा कार्गो व्हेरिएंटही सादर केले आहे. कंपनीचे मुख्य विपणन अधिकारी पंकज तिवारी यांना आशा आहे, याने ई-काॅमर्स सेगमेंटमध्ये ई सायकलच्या वापरातही वाढ होईल. बरोबरच पेट्रोलवर चालणाऱ्या स्कूटर आणि मोपेड आदींवरील परावलंबन कमी होईल.

किंमत

कंपनीच्या नेक्सझू रोडलार्कचे देशातील अनेक शहरांमध्ये डिलरशीप नेटवर्कवर मिळेल. कंपनीने मदुराई, चेन्नई, गुरुग्राम, विजयपूर, अहमदाबाद आणि वल्लभगडसारख्या शहरांमध्ये आपले नेटवर्कचेही विस्तार केले आहे. कंपनीची १०० किमी रेंजवाली इलेक्ट्रिक सायकलची किंमत ४४ हजार ८३ रुपयांपासून सुरुवात होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT