WhatsApp Canva
विज्ञान-तंत्र

तुमच्या संमतीशिवाय कोणीही अ‍ॅड करू शकणार नाही तुम्हाला ग्रुपमध्ये!

आता तुमच्या संमतीशिवाय कोणीही अ‍ॅड करू शकणार नाही तुम्हाला अनावश्‍यक ग्रुपमध्ये! 'ही' सेटिंग करा

श्रीनिवास दुध्याल

अनावश्‍यक ग्रुपमध्ये सामील होण्याचे कसे टाळायचे? तर जाणून घ्या या काही महत्त्वाच्या टिप्स.

आजकाल प्रत्येकजण आपल्या मित्र आणि कुटुंबातील सदस्यांशी कनेक्‍ट राहण्यासाठी WhatsApp ग्रुप्स वापरतो. पण तुमच्या परवानगीशिवाय कोणी तुम्हाला कोणत्याही ग्रुपमध्ये अ‍ॅड केल्यास समस्या वाढतात. अशा परिस्थितीत प्रश्न पडतो, की अनावश्‍यक ग्रुपमध्ये सामील होण्याचे कसे टाळायचे? तर जाणून घ्या या काही महत्त्वाच्या टिप्स. या टिप्सच्या मदतीने WhatsApp सेटिंग केल्यास तुम्ही स्वत:ला कोणत्याही WhatsApp ग्रुपमध्ये सामील होण्यापासून रोखू शकाल.

पनवानगीशिवाय कोणी तुम्हाला ग्रुपमध्ये सामील करू नये यासाठी "या' स्टेप्स फॉलो करा...

  • प्रथम WhatsApp ओपन करा

  • वर उजव्या बाजूला असलेल्या तीन डॉट्‌सवर क्‍लिक करा

  • सेटिंग्जमध्ये जा आणि अकाउंटवर टॅप करा

  • "प्रायव्हसी'वर जा आणि ग्रुप ऑप्शनवर टॅप करा

  • येथे तुम्हाला Every, My Contacts आणि My Contacts Except हा पर्याय मिळेल

  • या तिन्हीपैकी My Contacts Except हा पर्याय निवडा

  • आता ते संपर्क क्रमांक येथे निवडा, जे तुम्हाला ग्रुपमध्ये अ‍ॅड करू शकतील. यांच्या व्यतिरिक्त इतर कोणीही तुम्हाला कोणत्याही ग्रुपमध्ये अ‍ॅड करू शकणार नाही.

लवकरच येत आहे हे उत्कृष्ट फीचर

जगभरातील मोठे मेसेजिंग ऍप WhatsApp अनेक दिवसांपासून त्याच्या यूजर्ससाठी मेसेज रिऍक्‍शन या खास फीचरवर काम करत आहे. iOS च्या बीटा व्हर्जनवर नुकतेच हे फीचर दिसले. आता हे फीचर अँड्रॉईड बीटा व्हर्जनवर उपलब्ध आहे. हे फीचर सुरू केल्यामुळे यूजर्स इमोजीच्या माध्यमातून मेसेजवर आपला फीडबॅक देऊ शकतील. येत्या काही दिवसांत हे फीचर अँड्रॉइड आणि आयओएस यूजर्ससाठी रिलीज केले जाईल, अशी अपेक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT