Noise Buds X with ANC and 35 hours battery launched in India check price and features  
विज्ञान-तंत्र

Noise Buds X : कमी किंमतीत दमदार फीचर्स! 35 तासांपर्यंत चालते बॅटरी; जाणून घ्या डिटेल्स

सकाळ डिजिटल टीम

देशांतर्गत कंपनी Noise ने आपले नवीन इयरबड्स Noise Buds X लाँच केले आहेत. अ‍ॅक्टिव्ह नॉईज कॅन्सलेशन (ANC) सपोर्ट देखील देण्यात आला आहे. ट्रू वायरलेस स्टिरिओ इअरबड्स (TWS) मध्ये 12 मिमी ड्रायव्हर्स आणि ब्लूटूथ 5.3 सपोर्ट मिळतो.

तसचे इयरबड्समध्ये क्वाड माइक सपोर्ट आणि 35 तासांपर्यंत प्लेबॅक टाइम मिळतोय. बड्सना वॉटर रेसिस्टेंट IPX5 मानांकन देण्यात आले आहे. म्हणजेच पाण्यातही ते लवकर खराब होत नाहीत. नॉईज बड्स एक्स इयरबड्सच्या इतर फीचर्स आणि किंमतीबद्दल जाणून घेऊया...

नॉइज बड्स एक्सची किंमत किती आहे?

नव्याने लाँच झालेल्या नॉईज बड्स X ची किंमत 1,799 रुपये आहे. या बड्स कार्बन ब्लॅक आणि स्नो व्हाइट रंगाच्या पर्यायांमध्ये येतात. कंपनीच्या अधिकृत वेबसाइट आणि Amazon India वरून बड्स खरेदी करता येतील.

नॉइज बड्स एक्स चे स्पेसिफिकेशन

12mm स्पीकर ड्रायव्हर्स यामध्ये उपलब्ध आहेत, जे अॅक्टिव्ह नॉईज कॅन्सलेशन (ANC) सपोर्टसह येतात. कंपनीच्या मते, ते 25dB पर्यंत आवाज नियंत्रित करू शकते. इनवॉर्मेंटल नॉईज कॅन्सलेशन म्हणजेच ENC ला देखील बड्समध्ये क्वाड माइक सिस्टीम सपोर्ट दिला आहे. बड्समध्ये ट्रांसपरेंसी मोड देखील मिळते, ज्याच्या मदतीने सभोवतालचा आवाज सहजपणे ऐकू येतो. डिझाइनबद्दल बोलायचे झाल्यास, इयरबड्समध्ये हाफ-इन-इअर डिझाइन आहे, जे ओव्हल चार्जिंग केससह येते.

Noise मधील नवीन TWS इयरबड्स ब्लूटूथ 5.3 कनेक्टिव्हिटीसह येतात आणि A2DP, HFP, HSP आणि AVRCP प्रोफाइलला 10 मीटर अंतरापर्यंत सपोर्ट करतात. ते Android आणि iOS दोन्ही डिव्हाईसेसना जोडले जाऊ शकतात. Noise Buds X हायपरलिंक फीचरलादेखील सपोर्ट करते. सिरी किंवा गुगल असिस्टंट देखील बड्स एक्सेस करू शकतात. नॉईज बड्स X हे IPX5 रेटिंगसह येतात.

नॉइज बड्स एक्सची बॅटरी लाइफ

कंपनीचा दावा आहे की चार्जिंग केससह TWS इयरबड्स एका चार्जिंगवर 35 तासांपर्यंत प्लेबॅक टाइम देऊ शकतात. त्याच वेळी, एकाच चार्जमध्ये इयरबडमध्ये 7 तासांपर्यंत प्लेबॅक उपलब्ध आहे. तर ANC मोडवर, एकाच चार्जवर 5.5 तास आणि केससह 22.5 तासांपर्यंत इअरबड्स वापरता येतात. चार्जिंग केस यूएसबी टाइप-सी चार्जिंगला सपोर्ट करते. कंपनीचा दावा आहे की केवळ 10 मिनिटांच्या बड चार्जिंगमुळे 120 मिनिटांचा प्लेबॅक वेळ मिळतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump Special Envoy Sergio Gor: ट्रम्प यांचे विशेष दूत सर्जियो गोर यांचं मोठं विधान म्हणाले, ''भारत आमचा धोरणात्मक भागीदार अन्... ''

IND vs WI Test Series: केएल राहुलकडे कसोटी संघाचे नेतृत्व, श्रेयस अय्यरचे पुनरागमन; वेस्ट इंडिजविरुद्ध अशी असेल टीम इंडिया

Modem Balakrishna : कोण होता मॉडेम बालकृष्ण? तब्बल एक कोटींचा होता इनाम, खात्मा झाल्याने नक्षलवाद्यांना मोठा झटका

Pune News : तीन वर्षांच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या सावत्र बापाला मरेपर्यंत जन्मठेप

Nepal Protests : नेपाळमधील आंदोलनानंतर विमानसेवा सुरू, पर्यटकांचा मायदेशी परतीचा प्रवास

SCROLL FOR NEXT