Nokia 3210 eSakal
विज्ञान-तंत्र

Nokia 3210 : सगळ्यांचा लाडका नोकिया फोन येणार परत; कॅमेराही मिळणार? कंपनीने दिली मोठी अपडेट

HMD Global कंपनीने आपल्या एक्स हँडलवरुन पोस्ट करत याबाबत संकेत दिले आहेत. लीक्समध्ये समोर आलेल्या माहितीनुसार, या हँडसेटमध्ये तब्बल 108MP कॅमेरा देण्यात येऊ शकतो.

Sudesh

Nokia 3210 to return : नोकियाचा 3210 हा फीचर फोन आठवतोय? आपल्यापैकी कित्येकांच्या घरातील तो पहिला फोन होता. त्या काळात सर्वात लोकप्रिय हँडसेट असणारा हा फोन कालांतराने गायबच झाला. आता हाच फोन भारतीय मार्केटमध्ये पुन्हा एकदा एंट्री करणार आहे. नोकियाचे स्मार्टफोन बनवणाऱ्या HMD ग्लोबल या कंपनीने याबाबत माहिती दिली.

HMD Global कंपनीने आपल्या एक्स हँडलवरुन पोस्ट करत याबाबत संकेत दिले आहेत. "आज माझा वाढदिवस आहे, एक आयकॉन लवकरच परत येणार आहे" असं या पोस्टमध्ये म्हटलं आहे. यासोबतच नोकिया फोन्स असा हॅशटॅग देखील देण्यात आला आहे. ही पोस्ट कोणत्या मॉडेलबद्दल आहे याची माहिती स्पष्टपणे देण्यात आलेली नाही.

नोकिया 3210

ही पोस्ट कंपनीने 18 मार्च रोजी शेअर केली होती. 18 मार्च 1999 रोजी नोकियाचा 3210 हा स्मार्टफोन लाँच करण्यात आला होता. यामुळे, हाच फोन आता नव्या स्वरुपात भारतात पुन्हा येईल असा अंदाज टेकीज वर्तवत आहेत. अर्थात या फोनचं नाव 3210 असेल की अजून काही याबाबत अद्याप स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही.

108MP कॅमेरा

लीक्समध्ये समोर आलेल्या माहितीनुसार, या हँडसेटमध्ये तब्बल 108MP कॅमेरा देण्यात येऊ शकतो. याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. यासोबतच हा फोन कधी लाँच होणार याचीही माहिती कंपनीने दिलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akole Crime: अकोले तालुक्यात खळबळ! पाकिस्तानी ॲप कनेक्शनच्या संशयावरून चौकशी, एक चूक नडली अन् नेमकं काय घडलं..

Aditi Tatkare Mumbai Goa highway : मुंबई -गोवा महामार्गावरील टोल वसुलीला अदिती तटकरेंचा तीव्र विरोध, नितीन गडकरींची घेणार भेट

विकीच्या वाढदिवसादिवशी कतरिनाने शेअर केला विहान फोटो, विकीला म्हणाली, 'तुला शांतपणे ब्लॅक कॉफी पिण्यासाठी...' Post Viral

अश्या प्रकारच्या जल्लोष करण्यावर थेट बंदी घाला! अंबाती रायडू आयपीएलमधील 'त्या' ट्रेंडवर प्रचंड संतापला

सकाळी वडिलांकडे मिसळपाव मागितला, खाल्ल्यानंतर ३३ वर्षीय तरुणीनं नवव्या मजल्यावरून मारली उडी

SCROLL FOR NEXT