Nokia G50
Nokia G50 google
विज्ञान-तंत्र

Nokia G50 झाला लॉंच, पाहा किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

सकाळ डिजिटल टीम

Nokia G50 स्मार्टफोन जगतिक स्तरावर लॉन्च करण्यात आला आहे. नोकियाचा हा बजट फोन स्मार्टफोन सिंगल 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे. या स्मार्टफोनची किंमत 230 युरो, सुमारे 19,900 रुपये ठेवण्यात आली आहे. तसेच नोकिया G50 स्मार्टफोन ओशन ब्लू आणि मिड-नाइट सन कलर या दोन कलर ऑप्शनमध्ये येतो. हा नोकिया G50 स्मार्टफोन भारतात कधी लॉन्च केला जाईल या बद्दल कंपनीने अद्याप माहिती दिलेली नाही.

Nokia G50 चे फीचर्स

Nokia G50 स्मार्टफोन अँड्रॉईड 11 च्या आउट ऑफ द बॉक्स ऑपरेटिंग सिस्टमवर काम करेल. या स्मार्टफोनला दोन वर्षांचे अँड्रॉइड अपडेट आणि तीन वर्षांचे मंथली सेक्युरिटी अपडेट मिळतील. नोकिया G50 स्मार्टफोन ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 480 प्रोसेसर सपोर्टसह येईल. या फोनला 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज साठी सपोर्ट मिळेल. तसेच, मेमरी कार्डच्या मदतीने फोनचे स्टोरेड 512GB पर्यंत वाढवता येते.

Nokia G50 चा कॅमेरा

नोकिया G50 स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्याचा प्रायमरी कॅमेरा 48P आहे. तेसेच 5 एमपी अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आणि 2 एमपी डेप्थ सेन्सरला देण्यात आले आहेत. फोनच्या फ्रंट पॅनलवर 8MP सेंसर देण्यात आला आहे. फोनच्या पॉवर बॅकअप साठी फोन मध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली असून ती फोनला 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे.

फोनच्या डायमेंशन्स बद्दल बोलायचे झाल्यास, नोकिया जी 50 स्मार्टफोन 173 * 77.68 * 8.85 एसएस डायमेंशन्स मध्ये येईल. फोनचे वजन 220 ग्रॅम असून फोनमध्ये 3.5 मिमी ऑडिओ जॅक दिला आहे. याशिवाय फोन ड्युअल सिम सपोर्ट आणि यूएसबी टाइप-सी चार्जिंग पोर्टसह येतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi on Pune Porsche Accident: पुणे पोर्शे दुर्घटनेवरून राहुल गांधींनी PM मोदींवर सोडलं टीकास्त्र, म्हणाले 'दोन भारत...'

Badminton Rankings: भारताच्या सात्विक-चिरागचा बॅडमिंटनमध्ये डंका कायम! पुन्हा मिळवला नंबर वनचा ताज

अबबऽऽऽ चक्क मिळाले 100 टक्के गुण! बुद्धिबळ खेळणाऱ्या तनिषाने 100 टक्के गुण मिळवत जिंकला 'बारावी'चा डाव

Nashik Accident News: इगतपुरीच्या भावली धरणात ५ जणांचा बुडून मृत्यू; मृतांमध्ये तीन मुली व दोन मुलांचा समावेश

RR vs RCB Eliminator : कोणता रॉयल होणार 'इलिमिनेट', धडाकेबाज RCB समोर राजस्थान कामगिरी सुधारणार का?

SCROLL FOR NEXT