nokia g60 5g launched 
विज्ञान-तंत्र

Nokia G60 5G Launch: नोकियाचा पॉवरफुल फोन भारतात लॉंच; किंमत, फीचर्स जाणून घ्या

सकाळ डिजिटल टीम

HDM ग्लोबलच्या Nokia ब्रँडने नोकिया G60 5G नावाचा नवीन स्मार्टफोन भारतात लॉन्च केला आहे. हा डिव्हाइस 5G कनेक्टिव्हिटीला सपोर्टसह येतो. त्यामुळे तुम्हा चांगला 5G फोन शोधत असाल तर हा चांगला ऑप्शन ठरू शकतो. हा फोन Android 12 वर काम करतो. याव्यतिरिक्त, Nokia G60 5G मध्ये Snapdragon 695 प्रोसेसरचा समावेश आहे.

नोकिया G60 5G ची भारतात किंमत

Nokia G60 5G ड्युअल-सिमसह eSIM तंत्रज्ञानाला सपोर्ट करतो. हा भारतात 1 नोव्हेंबर ते 7 नोव्हेंबर दरम्यान अधिकृत नोकिया वेबसाइट आणि प्रमुख रिटेल आउटलेटवर प्री-बुकिंगसाठी उपलब्ध आहे.

कंपनीचा दावा आहे की मर्यादित कालावधीसाठी तुम्हाला यासोबत 3,599 रुपये किमतीचे नोकिया वायर्ड बड्स मोफत मिळतील. Nokia G60 5G ब्लॅक आणि आइस कलर पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. त्याच्या 6GB रॅम आणि 128GB स्टोरेजची किंमत 29,999 रुपये आहे.

Nokia G60 5G चे स्पेसिफिकेशन्स

लूक आणि डिझाइनच्या बाबतीत, Nokia G60 5G मध्ये पारंपारिक लुकऐवजी फ्लॅट-बॉडी डिझाइनसह येतो आणि आता ते आयफोन 12 सीरीजसारखा दिसतो. Nokia G60 मध्ये 120Hz रिफ्रेश रेट, फुल-एचडी+ रिझोल्यूशन (1080x2400 पिक्सेल), 400nits पीक ब्राइटनेस आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 संरक्षणासह मोठा 6.5-इंचाचा डिस्प्ले दिला आहे.

याशिवाय, डिस्प्लेमध्ये एक मूळ वॉटरड्रॉप-स्टाईल नॉच आहे, ज्यामध्ये 8-मेगापिक्सेल कॅमेरा देखील आहे. मागील बाजूस, Nokia G60 5G मध्ये 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी सेन्सर, 5-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड अँगल सेन्सर आणि 2-मेगापिक्सेलचा डेप्थ सेन्सर आहे.

स्मार्टफोनमध्ये 20W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 4500mAh बॅटरी आहे. कनेक्टिव्हिटी फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, यात ब्लूटूथ 5.1, 3.5 मिमी जॅक, एक टाइप-सी पोर्ट आणि ड्युअल-बँड वाय-फाय याचं समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना चॅलेंज देणारा सुशील केडिया कोण आहे? कसे कमावले कोट्यवधी रुपये?

१७ वर्षांनंतरही का आहे 'जाने तू... या जाने ना' ही चित्रपट सर्वांचाच लाडका सिनेमा– जाणून घ्या खास कारणं

IND vs ENG 2nd Test: Ohhh NO! शुभमन गिलच्या डोक्यावर चेंडू जोरात आदळला, डॉक्टरांची मैदानावर धाव अन्...

VIRAL VIDEO: यांना 'महाराष्ट्र केसरी' म्हणावं की दुसरं काही! दोन घोरपडीमध्ये रंगली दंगल, व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल

Alternative Careers: 9 ते 5 च्या ठराविक नोकरीला कंटाळला आहात? मग 'हे' 8 करिअर पर्याय तुमच्यासाठी ठरू शकतात योग्य पर्याय!

SCROLL FOR NEXT