विज्ञान-तंत्र

शक्तिशाली सौर वादळाची पृथ्वीला धडक; भारतातील लडाखसह युरोपीय देशांमध्ये विहंगम दृश्य

सकाळ वृत्तसेवा

केप कॅनाव्हरालः तब्बल दोन दशकांनंतर शक्तिशाली सौर वादळाने पृथ्वीला धडक दिल्यानंतर शुक्रवारी रात्री भारतातील लडाखसह युरोपातील बहुतांश देशांमध्ये ‘नॉर्दन लाईट्स’चे (ध्रुवीय प्रकाश) विहंगम दृश्य पाहायला मिळाले.

अमेरिका, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियाच्या अवकाशामध्ये विविध रंगांची उधळण झाली होती. अनेकांनी या कलरफूल रात्रीची छायाचित्रे आणि व्हिडिओ समाजमाध्यमांत व्हायरल केले. या सौर वादळाच्या प्रभावामुळे पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रामध्ये बदल झाल्याने याचा दळणवळण आणि दूरसंचार व्यवस्थेवर विपरीत परिणाम होऊ शकतो अशी भीती शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर ‘फेडरल इमर्जन्सी मॅनेजमेंट एजन्सी’ने अमेरिकेतील ऊर्जा प्रकल्पांच्या व्यवस्थापनांना काळजी घेण्याची सूचना केली आहे.

हे पृथ्वीवर धडकणारे हे दुसरे शक्तिशाली सौर वादळ असून ऑक्टोबर २००३ मध्ये आलेल्या ‘हॅलोवीन स्टॉर्म’मुळे स्वीडनमध्ये ब्लॅकआउट सदृश्य स्थिती निर्माण झाली होती. दक्षिण आफ्रिकेमधील ऊर्जा प्रणालीला देखील याचा मोठा फटका बसला होता. सूर्याच्या कोरोना आवरणामध्ये प्लाझ्मा आणि चुंबकीय क्षेत्राचा मोठा स्फोट होऊन सौर वादळाची निर्मिती होते.

एलॉन मस्क यांच्या ‘स्टारलिंक’ या सॅटेलाईन इंटरनेट ऑपरेटरने आतापर्यंतचे हे सर्वांत मोठे सौर वादळ असल्याचा दावा केला आहे. ‘‘ सध्या स्टारलिंकच्या मालकीच्या उपग्रहांवर प्रचंड दबाव असून आम्ही बऱ्याच काळापासून तग धरून आहोत,’’ असे मस्क यांनी ‘एक्स’ या प्लॅटफॉर्मवर व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे. ऑस्ट्रिया, जर्मनी, स्लोव्हाकिया, स्वित्झर्लंड, डेन्मार्क आणि पोलंडमध्ये प्रामुख्याने नॉर्दन लाईटचा विशेष प्रभाव पाहायला मिळाला.

ज्वाळांचा महाप्रचंड वेग

सूर्याच्या ‘एआर-१३६६४’ भागामध्ये उच्च क्षमतेच्या सौरज्वाळा निर्माण झाल्या असून त्या प्रतिसेकंद आठशे किलोमीटर एवढ्या वेगाने पृथ्वीच्या दिशेने झेपावत असल्याचे कोलकत्यातील ‘एक्सलन्स इन स्पेस सायन्सेस इन इंडिया’ (सीईएसएसआय) कोलकत्यामधील संशोधकांनी म्हटले आहे. भारतात लडाखमध्ये आकाशात किरमिजी रंगाचा प्रकाश पाहायला मिळाला.

पृथ्वीच्या उत्तर आणि दक्षिण ध्रुवाजवळ अवकाशामध्ये ध्रुवीय प्रकाशाची अनोखी रंगपंचमी पाहायला मिळाली. येथील रंगसंगती बदलत गेल्याचे दिसून आले. लडाखमध्ये काहीशी स्थिर स्थिती होती. दोन तासांपेक्षाही अधिक काळ ही स्थिती पाहायला मिळाली.

- स्टानझिन नोर्ला, अभियंते आणि अवकाश निरीक्षक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court : वक्फ कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, 'या' तरतुदींना दिली स्थगिती, संपूर्ण कायदा रद्द करणार?

Mumbai Rain: मुंबईत विजांसह ढगांचा गडगडाट! पुढील ३ तास महत्त्वाचे, हवामान विभागाचा 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट

Duleep Trophy Final : 4,4,W,4,W! CSK च्या गोलंदाजाचं मजेशीर षटक; पण, RCB च्या रजत पाटीदारच्या संघाला जेतेपद

Latest Marathi News Updates : सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी, करमाळ्यातील कोर्टी गाव पाण्याखाली

Asia Cup 2025 Point Table : टीम इंडिया Super 4 मध्ये पोहोचली! पाकिस्तानला काय करावं लागेल?; ब गटात आघाडीसाठी मारामारी

SCROLL FOR NEXT