Now Ganeshotsav has just on one click
Now Ganeshotsav has just on one click 
विज्ञान-तंत्र

आता सोनाटा गणेशोत्सव फक्त एका क्लिकवर...SONATA GANESHOTSAV

सकाळवृत्तसेवा

बुद्धी ज्ञान संपत्ती देणा-या भाग्यविधात्या गणपतीपुजनाचा दिवस म्हणजे गणेशचतुर्थी. या दिवशी भक्त आनंदात व उत्साहात बाप्पाचे स्वागत करतात. 11 दिवस चालणाऱ्या या सोहळ्यात गणपती आरती, गणेश मंत्र, फुले, प्रसाद आणि मोदक यांच्या बरोबर' गणपती बाप्पा मोरया म्हणून प्रतिष्ठापना केली जाते व ' पुढच्या वर्षी लवकर या' म्हणून 11व्या दिवशी गणपतीचे विसर्जन केले जाते.

गणपतीचा हा उत्सव साजरा करण्यासाठी सकाळ मीडिया ग्रुपच्या साहाय्यने सोनाटा गणेशोत्सव ऍप प्रथमच आणले आहे. ज्यामध्ये गणपती विश्‍वाची विस्तृत माहिती एका स्क्रोलवर उपलब्ध आहे. यामध्ये गणपती आरत्या, गणपतीचे डेकोरेशन, मोदक रेसिपी आणि सोबत तुमच्या शहरातील विसर्जन ठिकाणाची माहिती. या ऍपद्वारे 200 हून अधिक गणेश मंडळांचे दर्शन घेऊ शकता. 11 दिवस चालणा-या या सोहळ्यात अनेक स्पर्धाही सोनाटा गणेशोत्सवने जाहीर केल्या आहेत. 

आजच सोनाटा गणेशोत्सव app डाउनलोड करा. हे गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. किंवा https://play.google.com/store/apps/details?id=com.titan.ganeshotsav या लिंकवर क्लिक करुनही तुम्ही एॅप मिळवू शकता.

काय आहे सोनाटा गणेशोत्सव मध्ये 
1. गणपती मंडळाचे ठिकाण दर्शक:

11 दिवस चालणा-या या सोहळ्यात कुठे कुठे बाप्पा विराजमान झाले आहेत त्या 200 हून अधिक गणेश मंडळांच्या ठिकाणांची माहिती दिली आहे. तुम्ही देखील तुमच्या गणेशमंडळाच्या ठिकाणाची माहिती ऍड करू शकता. 

2. फेस्टिव्हल गाइड:
या ऍपमध्ये दहा दिवस चालणाऱ्या या उत्सवासाठी गणपती बाप्पाचे आगमन, गणेश स्थापना, गणपती आरती, संगीत, पर्यावरणपुरक गणेश मूर्ती, गणपती श्‍लोक व मंत्र, प्रसाद या सर्व संस्काराची मार्गदर्शक सूची आहे. त्याचबरोबर गणेश चतुर्थी स्पेशल असे मोदक, पंचखाद्य, पुरणपोळी, साबुदाणा वडा ए. रेसिपीही दिल्या आहेत. 

3. इव्हेंट:
गणपती संबंधी माहिती देणा-या अनेक इव्हेंटसचा संग्रह आहे जसे की मोदक बनवणे, पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनविणे या विषयीच्या कार्यशाळांची माहिती असेल ज्यामुळे तुमचा या गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित होईल.

4. गणपती आरती व व्हिडिओ बुकलेटस : घरच्या घरी गणपती प्रतिष्ठापना, पूजा पध्दतीची संपूर्ण माहिती असेल. गणेश आरती व अनेक व्हिडिओ लिंक्‍स यामध्ये दिलेल्या आहेत. एका क्‍लिकवर ही संपूर्ण माहिती उपलब्ध आहे. 

5. स्पर्धा: गणेशोत्सवाच्या दहा दिवसांसाठी दहा निरनिराळ्या स्पर्धा असतील. फॅशन, फूड, रेसिपी याविषयीच्या स्पर्धा असतील. दर दिवशीही घेतल्या जाणाऱ्या या स्पर्धांना 10 लाखांची बक्षिसेही सोनाटाकडून देण्यात येतील. यामुळे दररोज सहभागी व्हा आणि आनंद द्विगुणित करा. 

6. गणपती विसर्जन: शहरामध्ये असणा-या विविध गणेश मंडळाच्या विसर्जन कुठे , केव्हा या विषयीची माहिती या ऍपद्‌वारे तुम्हाला मिळेल. सकाळ मीडिया ग्रुपच्या सहाय्यने सोनाटा गणेशोत्सव ऍपच्या मदतीने तुम्ही विविध गणेश मंडळाच्या विसर्जनाची माहिती घरबसल्या मिळवू शकाल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT