now rent a Maruti Suzuki car company is running vehicle subscription plan check details  sakal
विज्ञान-तंत्र

स्वतःची गाडी परवडेना? मारुती सुझुकी स्वस्तात भाड्याने देतीय कार

सकाळ डिजिटल टीम

आपल्यापैकी प्रत्येकाचे कधीतरी स्वतःची कार घेण्याचे स्वप्न असते, परंतु बजेटच्या कमतरतेमुळे कित्येकांचे हे स्वप्न पूर्ण होत नाही. मात्र आता मारुती सुझुकी आणि महिंद्रा फायनान्स (Mahindra Finance) ने क्विकलिज (Quiklyz) च्या मदतीने एक योजना आणली आहे, ज्याच्या मदतीने ग्राहक स्वस्तात मासिक सबस्क्रिप्शन प्लॅनवर कार त्यांच्या घरी घेऊन जाऊ शकतात. याचा सामान्यांना काय फायदा होईल जाणून घेऊया..

या शहरांचा असेल समावेश

मारुती सुझुकीचा हा सबस्क्रिप्शन प्रोग्राम सध्या देशातील 20 शहरांमध्ये उपलब्ध असणार आहे. ज्यामध्ये दिल्ली-एनसीआर, बंगळुरू, हैदराबाद, पुणे, मुंबई, चेन्नई, अहमदाबाद, जयपूर, इंदूर, मंगलोर, म्हैसूर आणि कोलकाता या शहरांचा समावेश आहे.

ग्राहकांना त्यांची ठराविक मुदत संपेपर्यंत त्यांच्या पसंतीचे वाहन परत करणे, किंवा नवीन मॉडेल खरेदी तसेच अपग्रेड करण्याचा पर्याय निवडता येईल. ग्राहक क्विकलीज प्लॅटफॉर्मद्वारे त्यांच्या पसंतीचे वाहन घेऊन जाऊ शकतात. वाहन भाड्याने घेतलेल्या कालावधीसाठी, ग्राहकाला वाहन बदलणे, दुसरे निवडणे, परत करणे किंवा नवीन मॉडेलमध्ये अपग्रेड करण्याचा पर्याय उपलब्ध असेल.

ही योजना 2020 पासून सुरू आहे

MSIL ने जुलै 2020 मध्ये त्याचा सबस्क्रिप्शन प्रोग्राम सुरू केला, ज्या अंतर्गत ग्राहक मासिक सबस्क्रिप्शन प्लॅनवर मारुती सुझुकीची वाहने त्यांच्या घरी भाड्याने घेऊ शकतात. कंपनीने चालवलेल्या या योजनेत तुम्हाला महिन्याला ठराविक किंमत देऊन कार तुमच्या घरी घेऊन जाता येईल आणि कालावधी संपल्यानंतर तुम्ही ती परत करू शकता किंवा ठराविक किंमत पुन्हा भरल्यानंतर तुम्ही कार तुमच्याकडे ठेवू शकता.

मारुती सुझुकी इंडियाचे मार्केटिंग आणि सेल्सचे वरिष्ठ कार्यकारी संचालक शशांक श्रीवास्तव यांनी सांगितले की, आम्ही आमच्या ग्राहकांकडून मिळालेल्या माहिती आणि फीडबॅकवर आधारित आमचा वाहन सबस्क्रिप्शन प्रोग्राम सतत अपग्रेड करत आहोत. यामुळे आम्हाला कोलकाता सारख्या नवीन बाजारपेठांमध्ये मारुती सुझुकीची सबस्क्रिप्शन वाढवण्यास आणि महिंद्रा फायनान्सच्या सहकार्याने Quicklys सह भागीदारी करण्यास प्रोत्साहन मिळाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM-Kisan Samman Nidhi : 'या' शेतकऱ्यांना मिळणार नाही किसान सन्मान निधीचा २१ वा हप्ता, नवी अपडेट समोर; तुमचं नाव तर नाही ना? असं करा चेक

Pune Crime:'विनापरवाना पिस्तूलाची स्टंटबाजी दोघा मित्रांना भोवली'; तळेगाव एमआयडीसीतील घटना, एक गंभीर जखमी तर दुसरा पोलीस कोठडीत

Pro Kabaddi 12: पुणेरी पलटनचा तेलुगू टायटन्सवर ३९-३३ ने दमदार विजय! गुणतालिकेत गाठलं अव्वल स्थान

Jejuri Theft News: अख्खं गाव चोराच्या पाठीमागे, अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकलेच | Sakal News

Successful Delivery: 'साताऱ्यातील शासकीय रग्णालयात एका वेळी चार बाळांना जन्म'; आईसह तीन मुली, मुलगा सुखरूप, प्रसूतीची तिसरी वेळ

SCROLL FOR NEXT