Nvidia CEO on AI eSakal
विज्ञान-तंत्र

Nvidia CEO : 'कोडिंग तर एआय करेल.. तुम्ही शेतीकडे लक्ष द्या'; टेक कंपनीच्या सीईओंचा तरुणांना सल्ला

Jensen Huang : हुआंग हे दुबईमधील वर्ल्ड गव्हर्नमेंट समिटमध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी एआयमुळे आपल्या जगावर किती प्रभाव पडला आहे याबाबत आपलं मत मांडलं.

Sudesh

Nvidia CEO on Programing Languages and AI : जगातील दिग्गज टेक कंपन्यांपैकी एक असणाऱ्या Nvidia चे सीईओ जेनसेन हुआंग (Jensen Huang) हे सध्या चर्चेत आहेत. एकीकडे इतर कंपन्यांचे सीईओ तरुणांना कम्प्युटर लँग्वेज आणि कोडिंग शिकण्याचा सल्ला देत असताना, हुआंग यांनी मात्र याच्या अगदी उलट सल्ला दिला आहे. प्रोग्रामिंग लँग्वेज शिकण्याऐवजी आपण बायोलॉजी, मॅन्युफॅक्चरिंग किंवा शेती अशा गोष्टींवर लक्ष केंद्रित करायला हवं असं त्यांनी म्हटलं आहे.

हुआंग हे दुबईमधील वर्ल्ड गव्हर्नमेंट समिटमध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी एआयमुळे आपल्या जगावर किती प्रभाव पडला आहे याबाबत आपलं मत मांडलं. ते म्हणाले, की आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा (Artificial Intelligence) हा अगदी सुरुवातीचा काळ आहे. मात्र आताच एआय एवढं प्रगत झालं आहे की ते कोडिंग करू शकेल. त्यामुळे प्रोग्रामिंग लँग्वेज (Programing Language) शिकण्यावर वेळ वाया घालवण्याची गरजच उरलेली नाही.

"गेल्या दहा ते 15 वर्षांपासून टेक फील्डमधील प्रत्येक उच्चपदस्थ व्यक्ती तरुणांना कम्प्युटर सायन्स (Computer Science) आणि प्रोग्रामिंग शिकण्यास सांगत आहे. खरंतर परिस्थिती अगदी त्याच्या उलट आहे. आपलं कामच हे आहे की असं तंत्रज्ञान तयार करावं, ज्यामुळे कोणालाही प्रोग्रामिंग करण्याची गरज नसेल. एआयमुळे आज जगातील प्रत्येक व्यक्ती प्रोग्रामर झाला आहे", असं ते म्हणाले.

हुआंग पुढे म्हणाले, "तरुणांनी आता अधिक उपयोगी असणाऱ्या कौशल्यांना विकसित करण्याकडे भर द्यावा. बायोलॉजी, शिक्षण, मॅन्युफॅक्चरिंग, फार्मिंग आणि अशा क्षेत्रांकडे तरुण लक्ष देऊ शकतात. प्रोग्रामिंग शिकण्यासाठी लागणाऱ्या वेळात ते अशी कौशल्ये शिकू शकतात. कम्प्युटर प्रोग्रामिंग आता आपोआप होतंय, त्यामुळे लोकांना केवळ आपल्या नेहमीच्या भाषांचीच गरज आहे."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi cries! राजस्थान रॉयल्सच्या पराभवानंतर वैभव सूर्यवंशी रडला; त्याला असं पाहून सारेच हळहळले, Video

GT vs RCB IPL 2026 Final: गुजरात टायटन्स फायनलमध्ये RCB ला भिडणार! शुभमन गिलचे शतक अन् वैभव सूर्यवंशीच्या मेहनतीवर पाणी

GT vs RR Qualifier 2: साई सुदर्शन-शुभमन गिल, जोडीचा वर्ल्ड रेकॉर्ड! विराट-गेल, बाबर-रिझवान याचा विश्वविक्रम मोडला; हिट जोडी

महिला पोलिसांची मोठी कामगिरी! भांडणे मिटवून जोडला ५०१ महिलांचा पुन्हा जोडला संसार; दरमहा ३५ महिलांची पोलिसांत धाव, वाचा...

Manoj Jarange: तोडगा नाहीच! मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम; शिष्टमंडळ रात्रीतून मुख्यमंत्र्यांशी बोलणार

SCROLL FOR NEXT