Nvidia CEO on AI eSakal
विज्ञान-तंत्र

Nvidia CEO : कम्प्युटर सायन्स शिकण्याची गरजच नाही? एनव्हिडिया बनवणार 'माणसांपेक्षा हुशार' कम्प्युटर; स्वतःच करतील प्रोग्रामिंग

AI Computers : सीएनबीसीला दिलेल्या एका मुलाखतीत हुआंग यांनी एआय आणि तंत्रज्ञानाबाबत चर्चा केली.

Sudesh

Jensen Huang on AI Computer : जगातील अग्रगण्य टेक कंपन्यांपैकी एक असणाऱ्या एनव्हिडिया कंपनीचे सीईओ सध्या चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी नव्या पिढीला प्रोग्रामिंग लँग्वेज न शिकण्याचा सल्ला दिला होता. आता याचाच पुनरुच्चार करत, आपण माणसांपेक्षा हुशार कम्प्युटर बनवणार असल्याचं जेनसेन हुआंग यांनी म्हटलं आहे.

सीएनबीसीला दिलेल्या एका मुलाखतीत हुआंग यांनी एआय आणि तंत्रज्ञानाबाबत चर्चा केली. ते म्हणाले, "आम्ही असे कम्प्युटर बनवण्यावर भर देत आहोत, जे स्वतःच प्रोग्रामिंक करू शकतील. यामुळे माणसांना कम्प्युटर सायन्स शिकण्याची गरज भासणार नाही. कम्प्युटर्सना समजायला हवं की आपल्याला काय हवं आहे. त्यादृष्टीने त्यांनी स्वतःच काम करायला हवं. जेणेकरुन आपल्याला त्यांना प्रोग्राम करावं लागणार नाही."

नवीन एआय चिप

एनव्हिडिया हे नाव सध्या सेमिकंडक्टर निर्मिती क्षेत्रातील टॉपचं नाव आहे. काही दिवसांपूर्वीच या कंपनीने नवीन 'एआय चिप' सादर केली होती. या चिपच्या निर्मितीसाठी रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये कंपनीने तब्बल 10 बिलियन डॉलर्स खर्च केल्याचं मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगण्यात येत आहे. या एका चिपची किंमत तब्बल 30 ते 40 हजार डॉलर्स असू शकते. ही चिप सध्या उपलब्ध असणाऱ्या सेमिकंडक्टर्सच्या तुलनेत कित्येक पटींनी प्रगत असल्याचं म्हटलं जातंय. (NVIDIA new Chip)

आज सगळेच प्रोग्रामर

यापूर्वी देखील एका मुलाखतीत हुआंग यांनी एआयमुळे कसे बदल घडलेत हे सांगितलं होतं. कम्प्युटर आल्यानंतर लोकांना अशा गोष्टी करता येऊ लागल्या होत्या ज्या त्यापूर्वी शक्य नव्हत्या. एआय आल्यामुळे देखील तसाच बदल घडला आहे. एआयमुळे लोकांमधील 'डिजिटल डिव्हाईड' कमी झाला आहे. आधी ठराविक लोकांनाच कम्प्युटर प्रोग्रामिंग आणि इतर गोष्टी जमत होत्या. आज एआयमुळे सगळेच प्रोग्रामर होऊ शकतात, आणि कोडिंग करू शकतात, असं ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ST Pass : एकाच महिन्यात 5 लाख विद्यार्थ्यांना शाळेत मिळाले एसटी पास; कोणाला मिळतो सवलतीचा पास? वाचा...

Indian Women Cricket Team: भारतीय महिला संघ आज रचणार इतिहास; T20 मालिका जिंकण्याची संधी

"निलेश तू कसा आहेस माहितीये..." साबळेंच्या व्हायरल व्हिडिओनंतर मराठी अभिनेता झाला व्यक्त ; म्हणाला..

Sonipat Highway Accident : ढाब्यावर जेवण करून परतताना कार-ट्रकचा भीषण अपघात; तीन मित्रांचा दुर्दैवी अंत, एकाची प्रकृती गंभीर

Pune Railway Station: "थोरले बाजीराव पेशवे पुणे स्टेशन… "; रेल्वे स्थानकावर झळकले बॅनर, राज्यात नवा वाद पेटला!

SCROLL FOR NEXT