Odysseus lands on moon eSakal
विज्ञान-तंत्र

Odysseus lands on moon : चंद्रावर उतरलं अमेरिकेचं पहिलं खासगी मून लँडर; भारताच्या 'विक्रम'ला मिळाला शेजारी!

US Company Moon Landing : भारतीय वेळेनुसार पहाटे 4 वाजून 53 मिनिटांनी हे यान चंद्रावर उतरलं. एखाद्या खासगी कंपनीने अशी कामगिरी करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

Sudesh

US Intuitive Machines Odysseus lands on moon : अमेरिकेची खासगी अंतराळ संशोधन संस्था इंट्यूटिव्ह मशीन्सने नवा इतिहास रचला आहे. कंपनीच्या ऑडिसियस स्पेसक्राफ्टने चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ सॉफ्ट लँडिंग करून दाखवलं आहे. भारतीय वेळेनुसार पहाटे 4 वाजून 53 मिनिटांनी हे यान चंद्रावर उतरलं. एखाद्या खासगी कंपनीने अशी कामगिरी करण्याची ही पहिलीच वेळ आहे. यामुळे चंद्रावर उपस्थित असणाऱ्या भारताच्या 'विक्रम' लँडरला नवा शेजारी मिळाला आहे.

या मून लँडरच्या प्रक्षेपणासाठी अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाची (NASA IM-1 mission) मदत घेण्यात आली होती. ही मोहीम यशस्वी झाल्यामुळे आता चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ सॉफ्ट लँडिंग करणारा अमेरिका दुसरा देश झाला आहे.

काही दिवसांपूर्वीच ऑडिसियसचं लाँचिंग करण्यात आलं होतं. यानंतर यानाच्या नेव्हिगेशन सिस्टीमध्ये काही तांत्रिक अडचणी आल्या होत्या. मात्र तरीही नासाने ही लँडिंग यशस्वी करुन दाखवली. मिशन डायरेक्टर टिम क्रेन यांनी सांगितलं, की सध्या ऑडिसियस अगदी कमकमुवत सिग्नल पाठवत आहे. मात्र, त्याने सॉफ्ट लँडिंग केल्याचं आम्ही खात्रीने सांगू शकतो. "तुमचं पार्सल चंद्रावर सुखरुप पोहोचलं आहे", असं नासाने आपल्या एक्स पोस्टमधून Intuitive Machines कंपनीला सांगितलं.

मून लँडिंग करताना ऑडिसियसचा (Odysseus) वेग अचानक वाढल्यामुळे त्याला चंद्राला आणखी एक फेरी मारावी लागली होती. यामुळे लँडिंगची वेळ काही मिनिटांनी पुढे ढकलली गेली. अमेरिकेने यापूर्वी 1972 साली अपोलो 17 मोहिमेच्या माध्यमातून चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केलं होतं. तब्बल 52 वर्षांनी अमेरिकेतील खासगी कंपनीने ही कामगिरी करून दाखवली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT