Smartwach Sakal
विज्ञान-तंत्र

Smartwatch Offer: मस्तच! २० हजारांची स्मार्टवॉच फक्त १,९९९ रुपयात; डिझाइन हुबेहुब Apple Watch सारखे

फायर-बोल्टच्या स्मार्टवॉचला फक्त १,९९९ रुपयात खरेदी करण्याची संधी आहे. या वॉचमध्ये एकापेक्षा एक शानदार डिझाइन देण्यात आले आहे.

सकाळ डिजिटल टीम

Fire-Boltt SmartWatch Offer: नवीन स्मार्टवॉचसाठी आता जास्त पैसे खर्च करण्याची गरज नाही. दमदार फीचर्ससह येणाऱ्या स्मार्टवॉचला अवघ्या २ हजार रुपयांच्या बजेटमध्ये खरेदी करण्याची संधी आहे. ई-कॉमर्स साइट Amazon वरून तुम्ही २० हजार रुपयांच्या वॉचला २ हजार रुपयात खरेदी करू शकता.

Fire-Boltt Ninja Call Pro Plus SmartWatch ला खूपच कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी आहे. या वॉचचे डिझाइन जवळपास Apple Watch सारखे आहे. डिझाइन व्यतिरिक्त यूजर्स इंटरफेस देखील WatchOS पासून प्रेरित आहे. वॉच खरेदीवर तुम्हाला आकर्षक ऑफर्सचा फायदा मिळतो.

हेही वाचा - वाचा किस्से बँकेच्या लाॅकररुममध्ये घडलेले...एका बँक अधिकाऱ्याच्याच तोंडून

Fire-Boltt Ninja Call Pro Plus वर मिळेल बंपर डिस्काउंटचा फायदा

अ‍ॅमेझॉनवरून तुम्ही या वॉचला स्वस्तात खरेदी करू शकता. Fire-Boltt Ninja Call Pro Plus ची मूळ किंमत १९,९९९ रुपये आहे. परंतु, तब्बल ९० टक्के डिस्काउंटनंतर तुम्ही वॉचला १,९९९ रुपयात खरेदी करू शकता. याशिवाय, Citi Union Bank Debit Cards आणि HSBC Bank Credit Cards ने पेमेंट केल्यास ३०० रुपये अतिरिक्त डिस्काउंटचा फायदा मिळेल. Amazon Pay ICICI Credit Card ने पेमेंट केल्यास २५० रुपये कॅशबॅक दिला जात आहे.

Fire-Boltt Ninja Call Pro Plus चे फीचर्स

Fire-Boltt Ninja Call Pro Plus स्मार्टवॉचमध्ये १.८३ इंच स्क्वेअर डिस्प्ले देण्यात आला असून, याचे रिझॉल्यूशन २४०x२८४ पिक्सल रिझॉल्यूशन आहे. ब्लूटूथ कॉलिंग सपोर्टसह येणाऱ्या या वॉचमध्ये क्विक अ‍ॅक्सेस डायल पॅड, कॉल हिस्ट्री, सिंक कॉन्टॅक्ट्स सारखे फीचर्स दिले आहे. यामध्ये १०० पेक्षा अधिक स्पोर्ट्स मोड्सचा सपोर्ट मिळतो. तसेच, वॉइस असिस्टेंट सपोर्ट देखील दिला आहे. इन-बिल्ट स्पीकरसह अ‍ॅपल वॉचप्रमाणे अ‍ॅक्टिव्ह क्राउन बटन देण्यात आले आहे.

वॉचमध्ये गूगल असिस्टेंट आणि सिरीचा सपोर्ट दिला आहे. वेगवेगळ्या वॉच फेसेजसह येणाऱ्या वॉचमध्ये स्मार्ट नॉटिफिकेशन्स पाहता येतील. डिव्हाइसला वॉटर रेसिस्टेंटसाठी आयपी६७ रेटिंग मिळाले आहे. हार्ट रेट, SpO2 आणि स्लीप मॉनिटरिंग सारखे फीचर्स यात मिळतील. विशेष म्हणजे तुम्ही वॉचद्वारे फोनचा कॅमेरा आणि म्यूझिकला कंट्रोल करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तानला खरंच T20 World Cup चा गांभीर्य असेल तर...! R Ashwin ने सांगितला विजयाचा मंत्र, इंग्लंडला अडचणीत आणणारी चाल...

जुन्या आठवणी आणि नव्या कथा; मराठी भाषा गौरव दिनानिमित्त घरबसल्या पाहा हे ब्लॉकबस्टर मराठी चित्रपट

Latest Marathi News Live Update : बनावट कॉल सेंटरच्या माध्यमातून अमेरिकन नागरिकांची फसवणूक, पोलिसांनी केला पर्दाफाश

MHT CET Admission : ‘एमएचटी सीईटी’च्या प्रवेश नोंदणीस २७ फेब्रुवारीपर्यंत विलंब शुल्कासह मुदतवाढ

Thane News: मुरबाड नगर पंचायतमध्ये सत्तांतराची नांदी? नगराध्यक्ष संतोष चौधरींची कसोटी; किसन कथोरेंना शह देणारे आता भाजपच्या गोटात

SCROLL FOR NEXT