Nothing Sakal
विज्ञान-तंत्र

Smartphone Offer: ३८ हजारांचा फोन १० हजारात, ५० मेगापिक्सल कॅमेऱ्यासह मिळेल भन्नाट फीचर्स

नवीन वर्षात Nothing Phone 1 खरेदी करण्याची इच्छा असल्यास तुमच्याकडे चांगली संधी आहे. या फोनला तुम्ही १० हजार रुपयांच्या बजेटमध्ये खरेदी करू शकता.

सकाळ डिजिटल टीम

Offer On Nothing Phone 1: नवीन वर्षात Nothing Phone 1 खरेदी करायचा असल्यास तुमच्याकडे चांगली संधी आहे. या फोनला तुम्ही १० हजार रुपयांच्या बजेटमध्ये खरेदी करू शकता. या फोनची मूळ किंमत ३७,९९९ रुपये आहे. परंतु, फ्लिपकार्टवरून तुम्ही तब्बल २६ टक्के डिस्काउंटनंतर २९,९९९ रुपये किंमतीत खरेदी करू शकता. या फोनवरील कॅशबॅक, डिस्काउंट आणि एक्सचेंज ऑफरविषयी सविस्तर जाणून घेऊया.

Nothing Phone 1 वर मिळेल बंपर ऑफर

फोनच्या ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ३७,९९९ रुपये आहे. परंतु, २० टक्के डिस्काउंटनंतर २९,९९९ रुपये किंमतीत लिस्ट करण्यात आले आहे. यावर बँक ऑफर आणि एक्सचेंज ऑफरचा देखील फायदा मिळेल. फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक कार्डचा वापर केल्यास ५ टक्के कॅशबॅकचा फायदा मिळेल. तसेच, १० टक्के अतिरिक्त डिस्काउंट देखील दिले जात आहे. या फोनवर २० हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर देखील मिळेल. एक्सचेंज ऑफरचा पूर्ण फायदा मिळाल्यास फोनला १० हजारांच्या बजेटमध्ये खरेदी करू शकता.

हेही वाचा: Twitter: इलॉन मस्कने कर्मचाऱ्यांवर आणले वाईट दिवस, कामावर घेऊन जावा लागतोय टॉयलेट पेपर

Nothing Phone 1 चे स्पेसिफिकेशन्स

Nothing Phone 1 अँड्राइड १२ वर काम करतो. फोनमध्ये ६.५५ इंच फुल एचडी प्लस ओलेड डिस्प्ले देण्यात आला असून, याचा रिफ्रेश रेट १२० हर्ट्ज आहे. डिस्प्ले एचडीआर१०+ सपोर्ट आणि १२०० निट्स ब्राइटनेससह येतो. फोनमध्ये Snapdragon 778 G+ प्रोसेसरसह १२ जीबीपर्यंत LPDDR५ रॅम आणि २५६जीबीपर्यंत स्टोरेज मिळेल.

Nothing च्या या फोनमध्ये दोन रियर कॅमेरे देण्यात आले आहे. यातील एक ५० मेगापिक्सलचा Sony IMX 766 सेंसर आणि दुसरा ५० मेगापिक्सल Samsung JN1 सेंसर आहे. तर फ्रंटला १६ मेगापिक्सलचा Sony IMX471 कॅमेरा मिळेल. यात पॉवर बॅकअपसाठी ३३ वॉट वायर चार्जिंगसह ४५०० एमएएचची दमदार बॅटरी मिळते.

हेही वाचा: Inside Online Dating : हुक अप्स, ओपन रिलेशनशिप्स की...; महाराष्ट्रातील तरुणाई नक्की काय शोधते?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT