TVS Scooter
TVS Scooter Sakal
विज्ञान-तंत्र

TVS Scooter: अवघ्या ९ हजारात मिळतेय TVS ची लोकप्रिय बाईक, ६४ किमी माइलेज; पाहा डिटेल्स

सकाळ डिजिटल टीम

TVS Jupiter ZX Scooter Price: सार्वजनिक वाहनांच्या तुलनेत स्वतःचे वाहन असल्यास सहज कोठेही जाणे सहज शक्य होते. अपुऱ्या सार्वजनिक वाहतुक सुविधेमुळे अनेकजण दुचाकी वाहन खरेदी करण्याला प्राधान्य देतात. तुम्ही देखील नवीन स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे चांगली संधी आहे. TVS Motors च्या लोकप्रिय दुचाकीला खूपच कमी किंमतीत खरेदी करू शकता. TVS Jupiter ZX वर आकर्षक ऑफर उपलब्ध आहेत. TVS Jupiter ZX Disc with IntelliGo च्या किंमत, माइलेज आणि फीचर्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

हेही वाचा: सोंगी भजनाच्या माध्यमातून शांतारामबापूंनी घडवले दत्तदर्शन...

TVS Jupiter ZX Disc IntelliGo ची किंमत

TVS Jupiter ZX Disc IntelliGo चा सुरुवाती किंमत ८२,४४६ रुपये (एक्स-शोरुम) आहे. स्कूटरची ऑन रोड किंमत ९८,७६४ रुपये आहे. या स्कूटरला कॅश पेमेंटद्वारे खरेदी करण्यासाठी ९९ हजार रुपये खर्च करावे लागतील. मात्र, तुम्ही फायनान्स प्लॅनद्वारे फक्त ९ हजार रुपयात दुचाकीला घरी घेऊन जाऊ शकता.

TVS Jupiter ZX Disc IntelliGo फक्त ९ हजार रुपये डाउन पेमेंट देऊन खरेदी करता येईल. यासाठी तुम्हाला बँकेकडून ८९,७६४ रुपये कर्ज घ्यावे लागेल. मात्र, तुम्हाला ३ वर्ष दरमहिन्याला २,८८४ रुपये ईएमआय द्यावी लागेल.

TVS Jupiter ZX Disc IntelliGo मध्ये मिळेल पॉवरफुल इंजिन

TVS Motors च्या या स्कूटरमध्ये १०९.७ सीसीचे सिंगल सिलेंडर इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन ७.८८ पीएस पॉवर आणि ८.८ एनएम पीक टॉर्क जनरेट करते. कंपनीचा दावा आहे की स्कूटर एक लीटर पेट्रोलमध्ये ७४ किमी माइलेज देते. टीव्हीएसच्या या स्कूटरमध्ये तुम्हाला अनेक शानदार फीचर्स मिळतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT