Ola Electric's $4.4 Billion IPO Opens August 2 for Retail Investors esakal
विज्ञान-तंत्र

OLA IPO Launch : पैसे ठेवा तयार! ओला इलेक्ट्रिकच्या आयपीओची बाजारात एंट्री; 'या' तारखेला होणार लाँच

OLA In Share Market : ओला इलेक्ट्रिकचा हा IPO दोन टप्प्यांमध्ये पूर्ण होणार आहे. IPO मध्ये गुंतवणुकदारांना मोठी गुंतवणूक करण्याची संधी मिळणार आहे.

Saisimran Ghashi

Ola Shares For Retailers : देशातील आघाडीची इलेक्ट्रिक स्कूटर निर्माती कंपनी ओला इलेक्ट्रिक येत्या २ ऑगस्ट रोजी आयपीओ (IPO) लाँच करणार असल्याची घोषणा केली आहे. ही भारतातील इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातील पहिली आयपीओची घोषणा आहे. या IPO मध्ये गुंतवणुकदारांना मोठी गुंतवणूक करण्याची संधी मिळणार आहे.

ओला इलेक्ट्रिकचा हा IPO दोन टप्प्यांमध्ये पूर्ण होणार आहे. पहिल्या टप्प्यात २ ऑगस्ट रोजी संस्थात्मक गुंतवणुकदारांसाठी हा IPO खुला होईल तर १ दिवस आधी म्हणजेच १ ऑगस्ट रोजी हा IPO मोठ्या गुंतवणुकदारांसाठी खुला होणार आहे. ६ ऑगस्ट रोजी हा IPO सर्वसाधारण गुंतवणुकदारांसाठी बंद होईल.

वृत्तानुसार, ओला इलेक्ट्रिकची अंदाजित किंमत ४.२ ते ४.४ अब्ज अमेरिकन डॉलर इतकी असणार आहे. ही किंमत कंपनीच्या गेल्या सप्टेंबर २०२३ मध्ये झालेल्या निधी उभारणीपेक्षा १८.५ ते २२ टक्के कमी आहे. त्यावेळी सिंगापूरच्या टेमासेक या गुंतवणूक संस्थेने आघाडिपद घेतले होते आणि ओलाची किंमत ५.४ अब्ज अमेरिकन डॉलर इतकी ठरवली होती.

“मोठ्या गुंतवणुकदारांना हा IPO ४.२ ते ४.४ अब्ज अमेरिकन डॉलरच्या कमी बाजूने ऑफर केला जात आहे,” अशी माहिती IPO नियोजनाची थेट माहिती असलेल्या वृत्ताकडून कळली.

ओला या IPO मध्ये गुंतवणुकदारांना सहभागी होण्यासाठी कमी किंमत ठरवून देत आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदारांना सहभागी होण्याची संधी मिळेल, असे देखील म्हणले जात आहे.

भारताच्या इक्विटी मार्केटने गेल्या काही दिवसात अनेक विक्रम नोंदवले आहेत. तसेच ते हाँगकाँगला मागे टाकून जगातील चौथे सर्वात मोठे स्टॉक मार्केट बनले आहे. अशा वातावरणात ओला इलेक्ट्रिकचा हा IPO हा एक मोठा टप्पा मानला जात आहे.

या IPO मध्ये ओला इलेक्ट्रिक ५५ अब्ज रुपये इतकी (६५७ मिलियन अमेरिकन डॉलर) नवीन शेअर्स जारी करणार आहे. ही रक्कम जुन्या घोषणेप्रमाणेच ठेवण्यात आली आहे.

IPO म्हणजे काय?

IPO हे इंग्रजी शब्द Initial Public Offering चे संक्षिप्त रूप आहे. मराठीत याला प्रथम सार्वजनिक निर्गमन असे म्हणतात.

जेव्हा एखादी खाजगी कंपनी पहिल्यांदाच आपले शेअर्स सर्वसामान्य लोकांना विक्रीसाठी उपलब्ध करून देते, त्या प्रक्रियेला IPO म्हणतात. याचा अर्थ असा की, कंपनी आपल्या मालकीचा एक भाग जनतेला विकून निधी उभारते. हा निधी कंपनीच्या वाढीसाठी, नवीन उत्पादने विकसित करण्यासाठी, कर्ज फेडण्यासाठी किंवा इतर व्यावसायिक गरजा पूर्ण करण्यासाठी वापरला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT