विज्ञान-तंत्र

रिव्हर्स गिअर असलेली स्कूटर लवकरच बाजारात; चालते इलेक्ट्रिकवर

सुमित बागुल

बहुप्रतिक्षित ओला स्कूटर लवकरच ग्राहकांच्या सेवेत उपलब्ध होणार आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर सर्वांच्याच आकर्षणाचे केंद्र आहे.

ओला इलेक्ट्रिक स्कूटर (Ola Electric Scooter) लवकरच बाजारात धमाकेदार एंट्री करणार आहे. येत्या आठवड्यात स्कूटर लाँच होणार आहे. एका दिवसात तब्बल एक लाखांपेक्षा जास्त बुकींग झाले आहे. बहुप्रतिक्षित ओला स्कूटर लवकरच ग्राहकांच्या सेवेत उपलब्ध होणार आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर सर्वांच्याच आकर्षणाचे केंद्र आहे. भरीस भर म्हणजे या ओला स्कूटरमध्ये एक नवा आणि भन्नाट फिचर आहे. तो म्हणजे "रिव्हर्स मोड" (Reverse Mode) कंपनीने हा फिचर दाखवत एक व्हिडिओही ट्वीट केला आहे. सोशल मीडियावर ओला ई-स्कूटरला रिव्हर्स गिअरमध्ये चालवताना एक व्हिडिओ कंपनीचे CEO भाविश अग्रवाल यांनी ट्विट केले होते. ज्याच्या कॅप्शनमध्ये ‘हवामान बदलाला रिव्हर्स करण्याची क्रांती’ असे लिहिले आहे... 15 ऑगस्टला olaelectric.com वर भेटुया.

तुम्हाला ओला स्कूटरला स्पीडमध्ये रिव्हर्स करता येईल, ओला स्कूटरला ₹499 रुपयांवरही आरक्षित करु शकता असे ट्विट Ola Electric ने केले आहे. ओला स्कूटरमधील फिचर्स "सेगमेंट-फर्स्ट" आणि "सेगमेंट-बेस्ट" असल्याचा दावा केला आहे. ही नवी स्कूटर कीलेस एक्सपीरियन्स देईल. अर्थात चावी शिवाय फक्त तुमच्या स्मार्टफोनमधील ऍपच्या मदतीने तुम्ही ओला स्कूटर सुरु करु शकता. स्कूटरला बेस्ट-इन-सेगमेंट बूट स्पेस मिळेल असाही दावा करण्यात आला आहे.

ओला इलेक्ट्रिक 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिवसाच्या मुहुर्तावर लाँच करण्यात येणार आहे. याच दिवशी कंपनी स्कूटरच्या किंमतीसोबत डिलिव्हरी टाइम-फ्रेमचा खुलासा करेल.

लॉन्चच्याच दिवशी स्कूटरच्या ड्रायव्हिंग रेंजचाही खुलासा होण्याची आशा आहे. स्कूटरमध्ये फास्ट-चार्जिंग कॅपेबिलिटी मिळेल जी स्कूटरला 18 मिनिटांत 50 टक्क्यांपर्यंत चार्ज करु शकेल. स्कूटर 50 टक्के चार्जिंगमध्ये 75 किलोमीटर पार करु शकते असाही दावा कंपनीने केला आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे वायू प्रदुषण रोखण्यासाठी ही स्कूटर उत्तम पर्याय आहे. चढ्या दरांच्या पेट्रोल, डिझेलची गरज नाही म्हणजे पैशांची बचत आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अशा पद्धतीच्या इलेक्ट्रिक गाड्या काळाची गरज आहे. जेणेकरुन आपली पुढची पिढी तरी मोकळा आणि नितळ, स्वच्छ श्वास घेईल.

स्कूटरसाठी आताही बुकिंग सुरु आहे. इच्छुकांना केवळ ₹499 रुपयांच्या टोकनवर ओला स्कूटर बूक करता येणार आहे. फक्त 24 तासांच्या आतच 1 लाखपेक्षा जास्त बुकिंग झाल्या असल्याचे कंपनीने सांगितले. येत्या दिवसांत ओला इलेक्ट्रिक स्कूटरला रेकॉर्डब्रेक बुकींग येतील असा अंदाज वर्तवण्यात येतो आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanchita Ugale: एक्स प्रियकराचा त्रास, आरोग्य समस्या की नैराश्य? अभिनेत्री संचिता उगलेने का संपवलं आयुष्य? मैत्रिणीनं सगळंच सांगितलं!

FDA चा छापा; ५५ हजाराचा गुटखा जप्त, पण मकोकाअंतर्गत गुन्हा नाही, तुकाराम मुंढेंचे आदेश असतानाही टाळाटाळ?

Latest Marathi News Live Update : बनावट सहीच्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सीआयडीचे पथक कोलकाता येथील राज्य विधानसभेत दाखल झाले

IND A vs SL A, ODI: महागात पडली १० धावांची पेनल्टी; भारताने हातातला सामना सुपर ओव्हरमध्ये गमावला...

Strait of Hormuz: शांतता करार झाला, पण होर्मुजमधून जहाजांची वाहतूक धोकेदायकच! आंतरराष्ट्रीय शिपिंग संघटनेने स्पष्ट केली भूमिका

SCROLL FOR NEXT