ola s1 pro electric scooter catches fire in pune video goes viral on social media  
विज्ञान-तंत्र

पुण्यात Ola S1 pro इलेक्ट्रिक स्कूटरला आग; कंपनी म्हणते की..

सकाळ डिजिटल टीम

सध्या इलेक्ट्रीक स्कूटरची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यादरम्यान Ola S1 Pro इलेक्ट्रिक स्कूटरला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. पुण्यातील या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या 31 सेकंदांच्या व्हिडिओमध्ये, ओला एस1 प्रो इलेक्ट्रिक स्कूटर रस्त्याच्या कडेला उभी असलेली दिसत आहे, ज्यामधून धूर आणि जाळ निघताना दिसत आहे.

न्यूज18 ने दिलेल्या वृत्तानुसार, ओलाने आगीच्या घटनेला दुजोरा दिला आहे. कंपनीने सांगितले की, त्यांना पुण्यातील Ola S1 Pro मध्ये आग लागल्याची माहिती मिळाली असून आगीच्या कारणाचा शोध सुरू आहे. स्कूटरचा चालक पूर्णपणे सुरक्षित असल्याचे कंपनीने म्हटले आहे. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही, परंतु लिथियम-आयन बॅटरीचे खराब होणे किंवा शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

लिथियम-आयन बॅटरीमध्ये आग विझवणे खूप कठीण आहे. पाण्याच्या संपर्कात आल्यावर ते लगेच हायड्रोजन वायू आणि लिथियम-हायड्रॉक्साइड तयार करते. हायड्रोजन वायूने ​​आग लागते. मात्र, कारण काहीही असो, इलेक्ट्रिक स्कूटरला अशा प्रकारे आग लागणे ही नक्कीच भीतीदायक घटना आहे.

दरम्यान ही स्कूटर 115kmph च्या टॉप स्पीडसह आणि 180KM पर्यंत पूर्ण चार्जिंग रेंजसह येते. त्याची किंमत 1,29,999 रुपये (एक्स-शोरूम) आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 3.98kWh ची बॅटरी देण्यात आली आहे. Ola S1 हे बॅटरीच्या आतील भाग वगळता पूर्णपणे लोकल उत्पादन आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT