Oneplus 13 Launch Price Features  esakal
विज्ञान-तंत्र

Oneplus 13 Launch : स्मार्टफोन प्रेमींसाठी खुशखबर! या तारखेला लाँच होतोय Oneplus 13,चर्चेत असलेले खास फीचर्स अन् किंमत पाहा

Oneplus 13 Launch Price Features : OnePlus चा बहुप्रतिक्षित स्मार्टफोन OnePlus 13 दोन दिवसात लॉन्च होणार आहे.

Saisimran Ghashi

OnePlus चा बहुप्रतिक्षित स्मार्टफोन OnePlus 13, येत्या 31 ऑक्टोबरला चीनमध्ये लॉन्च होणार आहे. या फ्लॅगशिप मॉडेलची उत्सुकता शिगेला पोहोचली असून, लॉन्चपूर्वीच त्याच्या अनेक वैशिष्ट्यांची चर्चा आहे. Snapdragon 8 Elite चिपसेटसह Hasselblad ट्यून कॅमेरा सिस्टमनं सजलेला हा स्मार्टफोन दिवाळीत खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतोय.

OnePlus 13 मध्ये 6.7-इंचाचा Oriental X2 8T LTPO AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट, HDR10+, आणि Dolby Vision सपोर्टसह येणार आहे. टीजरनुसार या फोनचा कॅमेरा मॉड्यूल सुद्धा विशेष आहे. 50MP चा मुख्य कॅमेरा, 50MP टेलीफोटो, आणि 50MP अल्ट्रा-वाइड लेन्स असलेली ही ट्रिपल कॅमेरा सेटअप, Hasselblad च्या सहाय्याने फोटोग्राफीला नव्या उंचीवर नेईल.

OnePlus 13 मध्ये ColorOS 15 (चीनसाठी) आणि OxygenOS 15 (जागतिक बाजारासाठी) असे दोन ओएस पर्याय असणार आहेत. त्याशिवाय, 6,000mAh बॅटरी, 100W फास्ट चार्जिंग आणि वायरलेस मॅग्नेटिक चार्जिंगचा पर्याय यामुळे बॅटरी लाइफही चांगली असेल.

भारतीय स्मार्टफोन मार्केटमध्ये OnePlus 13 जानेवारी 2025 पर्यंत उपलब्ध होण्याची शक्यता आहे. या स्मार्टफोनची किंमत सुमारे 77,000 रुपये असू शकते. OnePlus चा हा फ्लॅगशिप स्मार्टफोन आता टेक वर्ल्डच्या नव्या युगाची सुरुवात करणार आहे, असे म्हणायला हरकत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

Latest Maharashtra News Updates : हांडेवाडीमध्ये टायर साठ्याच्या शेडला भीषण आग

ST Pass : एकाच महिन्यात 5 लाख विद्यार्थ्यांना शाळेत मिळाले एसटी पास; कोणाला मिळतो सवलतीचा पास? वाचा...

Indian Women Cricket Team: भारतीय महिला संघ आज रचणार इतिहास; T20 मालिका जिंकण्याची संधी

"निलेश तू कसा आहेस माहितीये..." साबळेंच्या व्हायरल व्हिडिओनंतर मराठी अभिनेता झाला व्यक्त ; म्हणाला..

SCROLL FOR NEXT