oneplus 9 pro price droped ahead of oneplus 10 pro launch in india  
विज्ञान-तंत्र

OnePlus 10 Pro लॉंच होण्यापुर्वी OnePlus 9 Pro मिळतोय स्वस्तात, पाहा ऑफर

सकाळ डिजिटल टीम

नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण पुढील आठवड्यात OnePlus 10 Pro लॉन्च होणार असून या इव्हेंटच्या अगोदर OnePlus 9 Pro च्या किंमतीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे, हा डिवाइस Amazon वर 59,999 रुपयांना लिस्ट झाला आहे. OnePlus 9 Pro मूळ किंमतीचा विचार केला तर हा फोन 65,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीला लॉंच करण्यात आला होता. त्यामुळे तुम्हाला या फ्लॅगशिप फोनवर तब्बल 6,000 रुपयांची सूट मिळत आहे.

ऑफर काय आहेत?

या किंमतीत Amazon वर 8GB RAM + 128GB स्टोरेज मॉडेल मिळत आहे. याशिवाय, SBI बँकेच्या क्रेडिट कार्डवर 8,000 रुपयांची सूट देखील आहे. तुमच्याकडे हे बँक कार्ड असल्यास, तुम्ही OnePlus 9 Pro हा फोन 51,999 रुपयांच्या किमतीत खरेदी करू शकाल. ज्यांना त्यांचा जुना फोन विकायचा आहे ते 16,600 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर देखील घेऊ शकतात. तुमच्या स्मार्टफोनच्या स्थितीनुसार एक्सचेंजची रक्कम मोजली जाते. OnePlus वापरकर्त्यांना ही ऑफर मिळवण्यासाठी OnePlus India च्या अधिकृत वेबसाइटवर एक्सचेंजची रक्कम देखील तपाता येईल.

OnePlus 9 Pro हा OnePlus चा एक फ्लॅगशिप फोन आहे जो 2021 मध्ये लॉंच केला गेला होता. यामध्ये तुम्हाला Qualcomm चा टॉप-एंड स्नॅपड्रॅगन 888 SoC मिळेल. आगामी OnePlus 10 Pro अधिक पावरफुल चिपसेट मिळेल. जुन्या आवृत्तीमध्ये एक अतिशय शक्तिशाली चिप आहे जी तुमला चांगला गेमिंग एक्सपिरिएंस देतो. हा फोन 65W फास्ट चार्जर, ड्युअल स्टीरिओ स्पीकर, 4,500mAh बॅटरी युनिट आणि ऑप्टिकल इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर यांसारख्या वैशिष्ट्यांसह येतो. डिव्हाइस देखील IP67 रेट केलेले आहे, म्हणून ते पाणी आणि धूळ प्रतिरोधक आहे.

यामध्ये तुम्हाला कर्व्ह्ड QHD+ AMOLED पॅनेल मिळेल, ज्याचा आकार 6.7-इंच आहे. स्मूद स्क्रोलिंग आणि गेमिंग अनुभवासाठी स्क्रीनला 120Hz रिफ्रेश रेटसाठी सपोर्ट दिला आहे. फोटोग्राफी आणि व्हिडिओंसाठी, क्वाड रिअर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये OIS सह 48-मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा, 50-मेगापिक्सेलचा दुय्यम अल्ट्रा-वाइड-एंगल सेन्सर, 8-मेगापिक्सेलचा टेलीफोटो कॅमेरा आणि 2-मेगापिक्सेलचा मोनोक्रोम कॅमेरा आहे.

गेल्या वर्षी, कंपनीने घोषणा केली होती की OnePlus 8 आणि नवीन आवृत्त्यांना तीन वर्षांचे Android OS अपडेट आणि चार वर्षांची सॉफ्टवेअर अपडेट मिळतील. OnePlus 9 Pro Android 11 सह लॉन्च करण्यात आला होता, त्यामुळे कदाचित त्याला Android 13 OS अपडेट देखील मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

Mughal Treasury Found: बापरे! मुगल काळातील खजिना सापडला, मनरेगा कामगारांना उत्खननादरम्यान असं काही सापडलं की प्रशासनही हादरलं

Success Story: १४ तास अभ्यास, परीक्षेच्या २० दिवस आधी घरातील सदस्य गमावला, अडचणीवर मात करून तरुण सीए बनला

SCROLL FOR NEXT