विज्ञान-तंत्र

बहुप्रतिक्षित 'वन प्लस 7 सिरीज'चे अनावरण 

सायली क्षीरसागर

बंगळुरू - बहुप्रतिक्षीत आणि लोकप्रिय अशा 'वन प्लस' सिरीजमधील 'वन प्लस 7' आणि 'वन प्लस 7 प्रो' या मोबाईलचे तर वन प्लसच्या 'बुलेट वायरलेस 2' या हेडफोन्सचे आज (ता. 14) 'बंगळुरू इंटरनॅशनल एक्सिबिशन सेंटर येथे अनावरण झाले. 

हटके वैशिष्ट्य आणि दुर्मिळ स्पेसिफिकेशन असलेल्या वन प्लस 7 सिरीजच्या अनावरणाला कंपनीचे संस्थापक कार्ल पाय उपस्थित होते. त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी वन प्लस 7 व वन प्लस 7 प्रोच्या वैशिष्टयांची माहिती दिली. फ्लूईड अॅमोलेड, 16 मेगापिक्सेल क्षमतेचा पॉप अप कॅमरा, 48 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमरा, गुगल लेन्स, 4000 एमएएच क्षमतेची बॅटरी, डॉल्बी अॅमॉस आणि ड्युअल स्पीकर्स ही 'वन प्लस 7 प्रो'ची वैशिष्ट्ये आहेत.

संपूर्ण स्क्रीनवर असलेला 6.7 इंच डिस्प्ले, 4000 एमएएच क्षमतेची बॅटरी ही वन प्लस प्रो ची महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत.

'बाजारात असलेल्या स्मार्टफोनमुळे आम्ही समाधानी नव्हतो. आम्ही स्वतःलाच आव्हान दिले आणि वन प्लसची सुरवात केली. वन प्लस सिरीज तुम्हाला नक्की समाधान देईल.'
- कार्ल पाय, संस्थापक - वन प्लस 

वन प्लस 7 प्रो च्या किंमती :
6 + 128 जीबी : 48, 999
8 + 256 जीबी : 52, 999
12 + 256 जीबी : 57, 999

वन प्लसच्या किंमती
6 + 128 जीबी : 32, 999
8 + 256 जीबी : 37, 999

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महत्त्वाची अपडेट! राष्ट्रीय महामार्गावरील पश्चिमेकडील पूल वाहतुकीसाठी बंद होणार? पंचगंगा पुलावर दुहेरी वाहतुकीची चाचणी, पर्यायी मार्ग कोणते?

मोहम्मद सिराजला मिळाला ICC चा मोठा पुरस्कार; म्हणाला, 'हा सन्मान फक्त माझा नाही, तर...'

"माझ्या आयुष्यात ती आली" महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम निखिल बनेने दिली आनंदाची बातमी, PHOTO VIRAL !

Kolhapur Crime: 'महेश राख खूनप्रकरणी चौघांना अटक'; आणखीन काही नावे निष्पन्न, न्यायालयात हजर करणार

Latest Marathi News Updates : ट्रक क्लिनरच्या अपहरण प्रकरणामुळे खळबळ; पूजा खेडकरच्या घरी पोलिस दाखल

SCROLL FOR NEXT