Gaming Industry eSakal
विज्ञान-तंत्र

Gaming Industry : गेमिंग क्षेत्राकडून १४ हजार कोटी ‘जीएसटी’; दरवाढीमुळे पुढील वर्षात अधिक करमहसुलाची अपेक्षा

ऑनलाइन गेमिंग कंपन्यांवर सरकारने ऑक्टोबर २०२३ पासून २८ टक्के वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू केला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Gaming Industry GST : पुढील आर्थिक वर्षात सरकारला ऑनलाइन गेमिंग कंपन्यांकडून १४ हजार कोटी रुपयांचा ‘जीएसटी’ जमा होण्याची अपेक्षा आहे, असे महसूल सचिव संजय मल्होत्रा यांनी आज येथे सांगितले. ऑनलाइन गेमिंग कंपन्यांवर सरकारने ऑक्टोबर २०२३ पासून २८ टक्के वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू केला आहे.

देशात ऑनलाइन गेमिंग (Online Gaming) कंपन्यांचे प्रस्थ मोठ्या प्रमाणात वाढत असून, ग्राहक ऑनलाइन गेम्सच्या आहारी जात असल्याबाबत चिंता व्यक्त करत, सरकारने या कंपन्यांवरील करआकारणी वाढवली. त्यामुळे जागतिक गुंतवणूकदारांची मोठी भागीदारी असलेल्या १.५ अब्ज डॉलरच्या या उद्योगाला मोठा धक्का बसला. ‘जीएसटी’ कमी करावा, अशी मागणी सातत्याने या उद्योगाकडून केली जात आहे.

या उद्योगाकडून सरकारला ३१ मार्च २०२३ रोजी संपणाऱ्या आर्थिक वर्षात सुमारे ७५ अब्ज रुपये कर महसूल मिळण्याचा अंदाज असून, मागील आर्थिक वर्षापेक्षा ते १६ अब्ज रुपयांपेक्षा जास्त असेल, असेही मल्होत्रा यांनी सांगितले. ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत ३५ अब्ज रुपये करउत्पन्न मिळाले असल्याचेही त्यांनी नमूद केले.

‘हा उद्योग आता स्थिर झाला आहे, तरीही निर्णायक टिप्पणी करणे खूप घाईचे होईल,’’ असेही ते म्हणाले. ऑनलाइन गेमिंग कंपन्यांवरील कररचनेचा आढावा एप्रिलमध्ये घेतला जाईल, परंतु याचा अर्थ कराच्या दरात बदल होईल, असा नाही, असेही मल्होत्रा यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT