Gas leak Detector
Gas leak Detector esakal
विज्ञान-तंत्र

Gas leak Detector : सामान्य दिसणारी ही गोष्ट आहे कामाची; अनेक वाईट प्रसंगातून वाचवणारा ऑनलाईन बल्ब!

Pooja Karande-Kadam

Gas leak Detector: अनेकदा घरात गॅस सिलेंडरचा स्फोट होतो. त्यासाठी कारण अगदी छोटी असतात. पण संपुर्ण संसार, घर उद्धस्त होतं. याचं कारण म्हणजे, घरातल्या सिलेंडरमधून होणारी गळती पटकन लक्षात येत नाही. त्यामुळेच जास्त अपघात होतात.

 या अपघाताला आळा बसावा यासाठी अनेक वस्तूंनी काळजी घेतली जाते. पण तरीही हलगर्जीपणा होतो आणि वाईट प्रसंग ओढावतो.

घरात आग लागण्यासारखी मोठी घटना टाळता यावी. म्हणून लोक अनेकदा घरात स्मोक डिटेक्टर लावतात. खरं तर स्मोक डिटेक्टर घराच्या एका कोपऱ्यात धूर उठत आहे हे सहज ओळखून अलार्म वाजवू लागतात.

यामुळे घरात उपस्थित लोक सतर्क होतात आणि आग वेळीच विझवली जाते. जेणेकरून तुमचं घर सुरक्षित राहील. बहुतेक स्मोक डिटेक्टर उपकरणे हेच करतात परंतु त्यांच्यात इतर कोणतीही वैशिष्ट्ये नसतात.

मात्र काळानुरूप तंत्रज्ञानही बदलत असून आता एक असे उपकरण बाजारात आले आहे जे केवळ धूर ओळखत नाही तर या उपकरणाचा वापर करून आपण घरात गॅस गळती होत आहे की नाही हे सहज शोधू शकता.

 खरं तर एलपीजी गॅसगळती स्वयंपाकघराच्या परिसरात होते. पण कधी कधी ती इतकी जास्त असते की ती धोकादायक ठरू शकते. हे लक्षात घेऊन आज आपण वाफेच्या गॅस गळतीसाठी एक मजबूत गॅजेट आणले आहे. हे गॅजेट काही मिनिटांतच घरात गॅसगळती होत असल्याचे शोधून काढते.

आम्ही ज्या डिव्हाइसबद्दल बोलत आहोत ते अॅमेझॉनवर उपलब्ध आहे. आणि त्याचे नाव Hello Nickix shield fire alarm आहे. हे कार्बन डाय ऑक्साईड, एलपीजी, मिथेन आणि हायड्रोजन सारख्या धूर तसेच वायू गळती शोधते. हे बल्बसारखे उपकरण असून बल्ब होल्डरमध्येच बसविण्यात आले आहे.

हा अलार्म तुम्ही घराच्या ज्या भागात गॅस गळतीची शक्यता आहे त्या भागात लावू शकता. जर तुम्ही गॅसच्या व्यवसायात असाल तर तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये किंवा गोडाऊनमध्येही याचा वापर करू शकता जेणेकरून आगीची घटना वेळीच टाळता येईल आणि त्यावर नियंत्रण मिळवता येईल.    

हे मशीन काम कसे करते

या गॅस अलार्मबद्दल बोलायचे झाले तर यात तुम्हाला अनेक फीचर्स पाहायला मिळतात

ज्यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम प्लग अँड युज फीचर मिळते ज्यामुळे हा फायर अलार्म वायरलेसली काम करू शकतो.

फक्त आपल्या घरातील बल्ब होल्डरमध्ये ते ठेवावे लागेल, त्यानंतर या डिव्हाइसला वीज पुरवठा होऊ लागतो आणि ते चांगले कार्य करते.  

या अलार्मचा आवाज इतका मोठा आहे की, 85 डेसिबलचा आवाज असल्याने घरात आणि घराबाहेर उपस्थित असलेल्या लोकांना तो सहज ऐकू येतो.

जर या डिव्हाइसच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर ग्राहक अॅमेझॉनवरून सुमारे 700 रुपयांमध्ये खरेदी करू शकतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs CSK Live Score: लॉकी फर्ग्युसनने तोडली रचिन-रहाणेची पार्टनरशीप, चेन्नईला तिसरा धक्का

Lok Sabha Election 2024: निवडणुकीदरम्यान 8,889 कोटींची रोकड, 4,000 कोटींचं ड्रग्ज जप्त! निवडणूक आयोगाची माहिती

Lok Sabha Election 2024 : रायबरेली, अमेठीत प्रचाराचा धडाका! राहुल गांधी विरुद्ध ‘स्थानिक’ असा तडका

Video: अत्यंत संतापजनक! भर बाजारात अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन; व्हिडिओ पाहून तुम्हालाही येईल राग!

RCB vs CSK: सँटेनरनं बॉलला स्पर्श केला अन् डू प्लेसिस रनआऊट झाला, पण विकेट अडकली वादाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT