Online Shopping esakal
विज्ञान-तंत्र

ऑनलाइन खरेदी करताना तुम्ही देखील 'या' चुका करता का?

सकाळ डिजिटल टीम

Online Shopping Mistakes : देशात ऑनलाइन शॉपिंगचा ट्रेंड खूप वाढला आहे. विशेषत: कोरोनापासून लोकांना अनेक प्रकारच्या वस्तू ऑनलाइन ऑर्डर करायला आवडत आहेत. परंतु बरेचदा लोक काळजी न घेता खरेदी करतात आणि पैसे दिल्यानंतर त्यांना अडचणींना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे काही खास गोष्टी लक्षात ठेवल्यास ही समस्या टाळता येऊ शकते.

1. ऑफरबद्दल जाणून घेणे महत्त्वाचे आहे

खरेदी करण्यापूर्वी प्रत्येक ऑफर आणि कॅशबॅकबद्दल जाणून घेणे महत्वाचे आहे, याशिवाय कंपनीकडून इतर अनेक ऑफर देखील दिल्या जातात. अशा परिस्थितीत, खरेदी करण्यापूर्वी प्रत्येक ऑफर व्यवस्थित तपासणे खूप महत्वाचे आहे.

2. फिल्टर टूल

शॉपिंग वेबसाइटवर, तुम्हाला प्रॉडक्ट फिल्टर करण्याचा पर्याय देखील दिला जातो. खरेदी करताना हा फिल्टर पर्याय वापरून तुम्ही तुम्हाला हवा तोच प्रॉडक्ट सर्च करु शकात. याच्या मदतीने तुम्ही योग्य ऑफर शोधून स्वतःचे पैसे देखील वाचवू शकता.

3. लगेच पैसे देऊ नका

पेमेंट करण्यापूर्वी डीलरशी संबंधित सर्व डिटेल्स तपासा. इतर वेबसाइटवर डीलर उपलब्ध आहे का ते देखील तपासा. अनेक वेळा Amazon सारख्या मोठ्या ई-कॉमर्स वेबसाइटवरही ग्राहक फसवणुकीचे बळी ठरतात. त्यामुळे कॅश ऑन डिलिव्हरीचा पर्याय उपलब्ध असल्यास तो निवडा.

4. पेमेंट ऑुप्शन्स तपासा

जर डीलर अस्सल असेल किंवा तुम्ही प्रसिद्ध ब्रँडमधून खरेदी करत असाल तर तुम्ही ऑनलाइन पैसे देऊ शकता. यामध्ये, तुम्हाला अनेक वेळा चांगल्या ऑफर पाहायला मिळतात, पण तुम्हाला COD वर जास्त पैसे द्यावे लागू शकतात.

5. रिटर्न पॉलिसी तपासा

कोणतेही प्रॉडक्ट ऑर्डर करण्यापूर्वी आणि पेमेंट करण्यापूर्वी, त्याच्याशी संलग्न रिटर्न पॉलिसी काळजीपूर्वक वाचा. अनेक वेळा डीलर्स तुम्हाला काही दिवसांसाठी रिटर्नची सुविधा देतात जसे की 3-4 दिवसात. त्यामुळे त्यानंतर प्रॉडक्ट परत करायचे असेल तर ते शक्य होत नाही. त्यामुळे ही माहिती काळजीपूर्वक वाचा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रुपाली चाकणकरांची चौकशी होणार? राजीनाम्यानंतर पक्षाकडूनही कारवाईचे संकेत, अडचणी वाढण्याची शक्यता

Satara ZP Violence : सातारा जिल्हा परिषदेत राडा! पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या हाताला जखम; भाजप कार्यकर्त्यांवर धक्काबुक्कीचा गंभीर आरोप

बिग बॉस मराठीमधून जुने सदस्य नाही तर या वाईल्ड कार्ड एन्ट्रीची एक्झिट ! सदस्यांनाही बसला धक्का

गलतीसे मिस्टेक! एअर इंडियानं कॅनडात प्रवेशाला बंदी असलेलं विमान पाठवलं, ४ तासांनी समजली चूक; तोपर्यंत विमान....

Satara Police Action : पालकमंत्र्यांचाही आदेश झुगारला! साताऱ्यात पोलिसांनी मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन करून कोणाला उचललं? हॉटेल रेडबटनवर रात्री 2 वाजता काय घडलं?

SCROLL FOR NEXT