Sam Altman to return as OpenAI CEO, firm says reached an agreement in principle Sakal
विज्ञान-तंत्र

Sam Altman: अखेर कंपनी बोर्ड झुकलं, 'Open AI'मध्ये परतणार सॅम अल्टमन; दुसरे फाउंडरही पुन्हा रुजू

Sam Altman: कंपनीत अंतर्गत गोंधळ अजूनही सुरूच आहे.

राहुल शेळके

Sam Altman: ChatGPT तयार करून आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या जगात क्रांती घडवणाऱ्या OpenAI या कंपनीसाठी गेला एक आठवडा वादळी ठरला. OpenAI च्या संचालक मंडळाने अचानक कंपनीचे सह-संस्थापक आणि CEO सॅम अल्टमन यांची कंपनीतून हकालपट्टी केली होती.

यानंतर ओपनएआयचे अध्यक्ष आणि सह-संस्थापक ग्रेग ब्रॉकमन आणि कंपनीच्या तीन वरिष्ठ संशोधकांनाही राजीनामा दिला होता. मात्र आता सॅम अल्टमन कंपनीत पुन्हा रुजू होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

(Sam Altman to return as OpenAI CEO, firm says reached an agreement in principle)

अहवालात म्हटले आहे की अल्टमन आणि बोर्ड सदस्य अ‍ॅडम डी'अँजेलो यांच्यात चर्चा सुरू होती. ओपनएआयने आज 22 नोव्हेंबर रोजी जाहीर केले की सॅम अल्टमनला सीईओ म्हणून परत येण्यासाठी करार झाला आहे. याबाबत एक्स पोस्ट करत कंपनीने माहिती दिली आहे.

कंपनीच्या ट्विटनुसार, यासंदर्भात तात्पुरत्या करारावर चर्चा झाली आहे. सॅम अल्टमन सीईओ म्हणून त्यांच्या पदावर परत येत आहेत. याशिवाय, ब्रेट टेलर (अध्यक्ष), लॅरी समर्स आणि अॅडम डीअँजेलो यांचा समावेश असलेले नवीन टीम देखील तयार केली जात आहे.

यासोबतच, कंपनीचे दुसरे संस्थापक ग्रेग ब्रोकमन यांनीही आपण कंपनीत पुन्हा रुजू होणार असल्याचं एक्स पोस्ट करत सांगितलं आहे.

मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला काय म्हणाले होते?

ओपन एआय सोडल्यानंतर मायक्रोसॉफ्टने सॅम अल्टमन यांना मायक्रोसॉफ्टच्या प्रगत एआय संशोधनाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी दिली होती. अल्टमन ओपनएआयमध्ये परत जातील का, असे मुलाखतीत विचारले असता नडेला म्हणाले होते की, दोन्ही मार्ग त्यांच्यासाठी खुले आहेत. याचा अर्थ असा की सॅमची इच्छा असल्यास, ते मायक्रोसॉफ्टमध्ये राहू शकतात किंवा ते ओपन एआयमध्ये परत जाऊ शकतात.

माहितीनुसार, सॅम अल्टमन एक नवीन आर्टिफिशियल इंटेलिजेंस कंपनी सुरू करण्याचाही प्लॅन करत आहेत. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही पुष्टी झालेली नाही. सॅमने ओपनएआयमधील त्यांच्या विश्वासू लोकांशी आणि ओपनएआयच्या काही प्रमुख संशोधकांशी एक नवीन आर्टिफिशियल इंटेलिजेंस कंपनी सुरू करण्याबाबत चर्चा केली असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र आता सॅम अल्टमन ओपन एआयमध्ये परतणार असल्यामुळे या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Warning: "बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, मेहता-बिहतांनी..." ; मिरा भाईंदर व्यापार्‍यांच्या बंद नंतर मनसेचा आक्रमक इशारा!

Amit Shah : अमित शहा यांचे पुण्यात आगमन; अनेक कार्यक्रमांना उपस्थिती

Latest Maharashtra News Updates : समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात, चौघांचा मृत्यू

Asian Hockey Cup: क्रीडा मंत्रालयाकडून पाकला हिरवा कंदील; भारतात खेळण्याची परवानगी

Kolhapur Police : कोल्हापुरातील गुंडगिरी संपवण्यासाठी एसपी अॅक्शन मोडवर, कुचकोरवी उर्फ एस. के. गॅंगच्या १७ जणांना केलं हद्दपार

SCROLL FOR NEXT