ChatGPT Advanced Voice Mode esakal
विज्ञान-तंत्र

ChatGPT Advanced Voice : चॅटजीपीटीला मिळाला स्वतःचा आवाज; आता टायपिंग न करता हवं ते विचारा,कसं वापराल हे नवं फीचर?

ChatGPT New Voice Feature : ओपनएआयने चॅटजीपीटीमध्ये ‘अॅडव्हान्सड वॉइस मोड’ची सुविधा देण्यास सुरुवात केली आहे.

Saisimran Ghashi

ChatGPT Update : चॅट जीपीटी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून असंख्य नवनवीन गोष्टी शिकतात आणि करता येणे शक्य झाले आहे. चॅट जीपीटीने या तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्याला अनेक सुविधा उपलब्ध करून दिले आहेत.

जगभरात आपल्या फीचर्सनी खळबळ माजवणाऱ्या चॅटजीपीटी आता ऐकूही शकतो आणि तुम्हाला हवी तशी उत्तरेही देऊ शकतो. हो, तुम्ही बरोबर वाचलेत. ओपनएआयने चॅटजीपीटीमध्ये ‘अॅडव्हान्सड वॉइस मोड’ची सुविधा देण्यास सुरुवात केली आहे. यामुळे वापरकर्ते आता चॅटजीपीटीशी आवाजाद्वारे संवाद साधू शकणार आहेत.

मात्र,हे करणे चॅटजीपीटीसाठी सोपे नव्हते. यापूर्वी चॅटजीपीटीचा आवाज हॉलिवूड अभिनेत्री स्कारलेट जोहान्सनच्या आवाजासारखा असल्याच्या टीकेनंतर ओपनएआयने या फीचरवर खूप काळजीपूर्वक काम केले आहे. या नव्या वॉइस मोडमध्ये कोणत्याही कलाकाराचा आवाज नक्कल करण्यात आलेला नाही, तर व्यावसायिक आवाज कलाकारांच्या मदतीने चार वेगवेगळे आवाज तयार करण्यात आले आहेत.

सुरक्षेच्या दृष्टीनेही ओपनएआयने चाचणी घेतली आहे. १०० हून अधिक तज्ञांनी चॅटजीपीटीच्या चाचण्या घेतल्या आहेत. तसेच, संगीत आणि इतर कॉपीराइट कंटेंटसाठीही फिल्टर लावण्यात आले आहेत. या सर्व गोष्टी अगदी काळजीपूर्वक केल्यानंतरच ओपनएआयने हा नव्या आवाज मोडचा वापर सुरू केला आहे. सध्या हा मोड काही निवडक वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे. मात्र, येत्या काळात सर्व वापरकर्त्यांसाठी तो खुला करण्यात येणार आहे.

या नव्या वैशिष्ट्यामुळे चॅटजीपीटी आणि वापरकर्त्यांमधील संवाद अधिक सहज आणि मनोरंजक होणार आहे, अशी अपेक्षा आहे.चॅटजीपीटीने नुकतेच त्यांचे सर्च इंजिन लॉंच करण्याची देखील घोषणा केली.चॅटजीपीटीमुळे मानवाची बरीच कामे हलकी होतात आणि कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानाच्या जोरावर आता नवनवीन गोष्टी करणे शक्य झाले आहे. आता पूर्वी सारखे चॅट जिपिटिवर टायपिंग न करता थेट वॉइस फीचरचा वापर करून तुम्ही सहज हव्या त्या गोष्टी मिळवू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोकाटेंनंतर महायुतीच्या महिला मंत्री वादाच्या भोवऱ्यात,भरसभेत थेट अधिकाऱ्याला थप्पड मारण्याची धमकी, व्हिडिओ व्हायरल

मनोज जरांगे लिफ्टने वरच्या मजल्यावर जात होते, अचानक बिघाड झाला अन् थेट जमिनीवर आदळली लिफ्ट; बीडमधील घटनेनं खळबळ

Satara Politics: जावळीकर पुन्‍हा संघर्षाच्‍या वळणावर?; शिंदेंच्‍या सत्‍कारावेळीच मानकुमरेंच्‍या अन्‍याय मोर्चा

VIDEO: 'पिंगा गं पोरी पिंगा...' 'सावळ्याची जणू सावली' मालिकेतील सावलीचा नऊवारी साडीत भन्नाट डान्स, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Video : वर्गात गुरुजी शिकवतानाच कोसळलं शाळेचं छत, तिथेच एक विद्यार्थी....; घटनेचा व्हिडीओ आला समोर

SCROLL FOR NEXT