Paytm Auto eSakal
विज्ञान-तंत्र

Paytm Auto : ऑनलाईन रिक्षाच्या स्पर्धेत आणखी एका प्लेयरची उडी! 'पेटीएम ऑटो'ची चाचणी सुरू

Paytm : देशात अ‍ॅप बेस्ड कॅब, टॅक्सी आणि रिक्षा सुविधा देणाऱ्या कंपन्यांमध्ये ओला आणि उबरचा दबदबा आहे.

Sudesh

Paytm Auto Test : फिनटेक सेक्टरमधील अग्रगण्य कंपनी असणारी पेटीएम ही आता आणखी एका सेक्टरमध्ये उडी घेणार आहे. पेटीएम आता लवकरच राइड हेलिंग सर्व्हिसेस पुरवणाऱ्या कंपन्यांच्या पंक्तीत जाऊन बसेल. यासाठी ऑटोरिक्षाची चाचणी सुरू करण्यात आल्याची माहिती मनीकंट्रोलने दिली आहे.

रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांमध्ये पेटीएम दिल्ली, बंगळुरू, चेन्नई अशा महानगरांमध्ये ऑटोरिक्षा सर्व्हिस सुरू करणार आहे. यासाठी पेटीएम ओएनडीसी, म्हणजेच ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्सची मदत घेईल.

ओला-उबरचं टेन्शन वाढणार

देशात अ‍ॅप बेस्ड कॅब, टॅक्सी आणि रिक्षा सुविधा देणाऱ्या कंपन्यांमध्ये ओला आणि उबरचा दबदबा आहे. गेल्या काही काळात रॅपिडो आणि इतर काही स्थानिक अ‍ॅप्समुळे यात स्पर्धा वाढली आहे. यातच आता पेटीएम सारखा मोठा प्लेयर यात आल्यामुळे ओला-उबरचं टेन्शन नक्कीच वाढणार आहे.

ठराविक यूजर्ससाठी फीचर उपलब्ध

रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, ठराविक पेटीएम अ‍ॅप्सवर राईड हेलिंग फीचर उपलब्ध झालं आहे. या फीचरची चाचणी पूर्ण झाल्यावर टप्प्या-टप्प्याने ते इतर यूजर्ससाठी उपलब्ध करुन देण्यात येईल. पेटीएमने याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT