Spider-Man 2 Game eSakal
विज्ञान-तंत्र

Spider-Man Game : अवघ्या 30 तासांमध्ये कम्प्लीट होतेय 'स्पायडर-मॅन 2' गेम; लाँचपूर्वीच गेमरने केला मोठा दावा

Gaming : मार्व्हलची 'स्पायडर-मॅन 2' ही गेम 20 ऑक्टोबरला लाँच होणार आहे.

Sudesh

मार्व्हलची 'स्पायडर-मॅन 2' ही गेम 20 ऑक्टोबरला लाँच होणार आहे. मात्र, त्यापूर्वीच ती गेम लीक झाली असून, कित्येक स्पॉयलर्स देखील समोर येत आहेत. यातच एका गेमरने ही गेम पूर्ण केल्याचा दावा केला आहे. एवढंच नाही, तर अवघ्या 30 तासांमध्ये ही गेम कम्प्लीट केल्याचं त्याने म्हटलं आहे.

ख्रिस गेमिंग 95 या एक्स हँडलवरून हा दावा करण्यात आला आहे. ख्रिसने आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय, की 30 तासांमध्ये मी 'स्पायडर-मॅन 2' गेममध्ये प्लॅटिनम लेव्हलला पोहोचलो आहे. यासोबतच त्याने गेममधील स्क्रीनशॉट देखील पोस्ट केला आहे, ज्यात तो प्लॅटिनम रँकला दिसत आहे.

Spider-Man 2 Game

इनसाईडर गेमिंग या वेबसाईटने याबाबत माहिती दिली आहे. गेम पूर्ण केल्याचा अधिक पुरावा या वेबसाईटने ख्रिसला मागितला. यानंतर त्याने त्याने अधिक माहिती दिली. मात्र, याबाबतची अधिक माहिती सार्वजनिक करता येणार नसल्याचं वेबसाईटने स्पष्ट केलं आहे. दरम्यान, एवढा कमी प्ले-टाइम असल्यामुळे फॅन्स आणि गेमर्समध्ये नाराजी पसरली आहे.

ख्रिसने असाही दावा केला आहे, की यापूर्वी आलेल्या पहिल्या स्पायडर-मॅन गेमला संपवण्यासाठी त्याला 33 तास लागले होते. तसंच, माइल्स मॉरेल्स या गेमला पूर्ण करण्यासाठी त्याला 17 तासांचा वेळ लागला होता. इतर काही गेमर्सनी रेडिटवर दिलेल्या माहितीनुसार, ख्रिस हा स्पीड-रनर गेमर असू शकतो. कारण कित्येकांनी ही गेम कम्प्लीट करण्यासाठी आपल्याला 40 ते 60 तासांचा वेळ लागल्याचं म्हटलं आहे.

पहिल्यापेक्षा मोठा आहे दुसरा भाग

मार्व्हलच्या पहिल्या स्पायडर-मॅन गेमच्या तुलनेत दुसरा भाग मोठा असल्याचं सांगितलं जातंय. लीक्समध्ये मिळालेल्या माहितीनुसार, या गेमची साईज देखील मोठी आहे. तसंच गेमच्या मॅपमध्ये क्विन्स आणि ब्रूकलीन ही शहरं देखील जोडण्यात आली आहेत. यामुळे पीटर पार्कर आणि माईल्स मॉरेल्स या पात्रांना अधिक क्वेस्ट मिळणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: Virat Kohli त्याचे सामनावीर ट्रॉफी कुठे ठेवतो? न्यूझीलंडविरुद्ध पुरस्कार जिंकल्यानंतर सांगून टाकलं

WPL 2026, DC vs GG: १ बॉल अन् ५ धावा... गुजरात जायंट्सने मिळवला थरारक विजय, जेमिमाच्या दिल्लीचा सलग दुसरा पराभव

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

SCROLL FOR NEXT