PM Modi at IMC eSakal
विज्ञान-तंत्र

PM Modi at IMC : 'इंडिया मोबाईल काँग्रेस'चे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन; तीन दिवस होणार विविध कार्यक्रम

दिल्लीतील प्रगती मैदानावर असणाऱ्या भारत मंडपम याठिकाणी तीन दिवस ही परिषद असणार आहे.

Sudesh

सातव्या इंडिया मोबाईल काँग्रेसचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. दिल्लीतील प्रगती मैदानावर असणाऱ्या भारत मंडपम याठिकाणी तीन दिवस ही परिषद असणार आहे. यावेळी त्यांच्यासोबत रिलायन्स जिओचे चेअरमन आकाश अंबानी देखील उपस्थित होते.

या परिषदेच्या माध्यमातून टेलिकॉम आणि तंत्रज्ञान क्षेत्रात भारताने किती प्रगती केली आहे, हे जगासमोर मांडण्यात येईल. 27 ते 29 ऑक्टोबर असे तीन दिवस ही परिषद असणार आहे. याला जगभरातील 22 देशांमधील एक लाखांहून अधिक प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

आकाश अंबानी यांनी पंतप्रधान मोदींना रिलायन्स जिओ आणि 5G तंत्रज्ञानाबद्दल अधिक माहिती दिली. टेलिकम्युनिकेशन क्षेत्रात जिओ कंपनी कशा प्रकारे काम करत आहे, याबाबत अंबानी यांनी मोदींना सांगितले. यासोबतच भारतातील पहिली सॅटेलाईट-आधारित गिगा फायबर सेवा 'जिओ स्पेस फायबर' देखील जिओने याठिकाणी सादर केली.

यावर्षीची थीम

यावर्षीच्या इंडिया मोबाईल काँग्रेसची थीम 'ग्लोबल डिजिटल इनोव्हेशन' अशी आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा विकासक, निर्माता आणि निर्यातक म्हणून भारताचे स्थान मजबूत करणे हे याचे मुख्य उद्दिष्ट आहे.

या तीन दिवसीय परिषदेमध्ये 5G, 6G, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) सारख्या तंत्रज्ञानावर प्रकाश टाकला जाईल. तसंच सेमीकंडक्टर उद्योग, हरित तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा इत्यादींशी संबंधित समस्यांवर चर्चा होणार आहे. यासोबतच नवीन स्टार्टअप्सना चालना देण्यासाठी आणि प्रस्थापित उद्योजकांमध्ये परस्पर संबंध वाढवण्यासाठी 'अस्पायर' हे अभियान देखील राबवण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ketan Agrawal Case: लोहगडावर पुन्हा मर्डर सीन, केतनचा पुतळा पुन्हा तेथूनच फेकला

Pune Breaking News: पुण्यात झाड कोसळलं, मुलगी बचावली,घटना CCTVमध्ये कैद

State Award: अंबडच्या लालवाडीतील प्रगतशील शेतकरी गोवर्धन उगले यांना राज्यस्तरीय कृषीभूषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार

चंद्रपूरमध्ये वनक्षेत्राबाहेर आढळला वाघाचा मृतदेह; शिकार की नैसर्गिक मृत्यू? गूढ वाढलं...परिसरात खळबळ

Rajapur Tourism: जिथे शिवरायांनी इंग्रजांना धडा शिकवला... राजापूरची ऐतिहासिक ब्रिटिशकालीन वखार नव्या रूपात सज्ज; पर्यटनाचे नवे आकर्षण

SCROLL FOR NEXT