G20 India App eSakal
विज्ञान-तंत्र

G20 India App : जी-20 परिषदेची सर्व माहिती एका क्लिकवर मिळणार; पंतप्रधान मोदींनी लाँच केलं खास अ‍ॅप

G20 Summit : दिल्लीमध्ये 9 आणि 10 सप्टेंबर रोजी जी-20 परिषदेची बैठक पार पडेल.

Sudesh

राजधानी दिल्लीमध्ये 9 आणि 10 सप्टेंबर रोजी जी-20 परिषदेची मोठी बैठक पार पडणार आहे. या बैठकीला कित्येक देशांचे अध्यक्ष, राष्ट्रपती आणि पंतप्रधान उपस्थित राहणार आहेत. याच निमित्ताने पंतप्रधान मोदींनी 'जी-20 इंडिया' नावाचं एक खास अ‍ॅपही लाँच केलं आहे.

या अ‍ॅपच्या मदतीने G20 परिषदेची सर्व माहिती सामान्य लोकांपर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे हे अ‍ॅप सर्वांनी डाऊनलोड करावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.

असं करता येईल डाऊनलोड

G20 India हे अ‍ॅप अँड्रॉईड आणि iOS या दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. याठिकाणी सर्च केल्यानंतर हे अ‍ॅप तुम्हाला मिळेल. डाऊनलोड केल्यानंतर यामध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल. यानंतर जी-20 परिषद आणि बैठकीबाबत तुम्हाला सर्व माहिती मिळेल.

काय आहेत फीचर्स?

या अ‍ॅपच्या माध्यमातून जी-20 बैठकांचं आणि कार्यक्रमांचं वेळापत्रक, प्रेस रिलीज आणि जी-20 काय आहे याबाबत सर्व माहिती मिळू शकते. विशेष म्हणजे हे अ‍ॅप जगभरातील तब्बल 24 भाषांमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळेच, जी-20 परिषदेला उपस्थित असणाऱ्या इतर देशांमधील नागरिकांनाही हे वापरता येणार आहे. या अ‍ॅपमध्ये नेव्हिगेशन सुविधा देखील देण्यात आली आहे. विदेशी प्रतिनिधींना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यास मदत होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Overhead Cable : ओव्हरहेड केबल धोरणाला स्थायीची मान्यता; अनधिकृत केबल वर्षभरासाठी होणार नियमित

'ऑपरेशन टायगर'चा दुसरा भाग खरंच येणार? मंत्री प्रताप सरनाईक यांचा दावा की मिश्किल टिपण्णी? कैलास पाटलांबद्दल काय म्हणाले?

RBI चा मोठा निर्णय! 'ही' सुविधा वेळेआधी होणार बंद; ग्राहकांसाठी काय बदलणार? जाणून घ्या...

Ajinkya Rahane Exclusive : अजिंक्यचे भारताकडून खेळण्याचे स्वप्न पूर्ण होईल की नाही, याची भीती होती.. पण तो खचला नाही! राधिकाचे डोळे भरून आले, रहाणेने सावरले...

Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील ३६,२११ कंपन्या बंद झाल्या? चर्चेवर देवेंद्र फडणवीसांचा खुलासा; शरद पवारांना सांगितलं सत्य

SCROLL FOR NEXT