PM Modi National Science Day eSakal
विज्ञान-तंत्र

Science Day : 'विकसित भारताचं स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी...'; PM मोदींनी दिल्या विज्ञान दिनाच्या शुभेच्छा! शेअर केला खास व्हिडिओ

PM Modi Video : या व्हिडिओच्या माध्यमातून PM मोदींनी वैज्ञानिकांना प्रोत्साहन दिलं आहे. आपल्या एक्स हँडलवरुन पंतप्रधानांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.

Sudesh

PM Modi Wishes on National Science day : २८ फेब्रुवारी हा दिवस भारतात 'राष्ट्रीय विज्ञान दिन' म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने पंतप्रधान मोदींनी एक खास व्हिडिओ शेअर करत देशातील वैज्ञानिकांना आणि सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. या व्हिडिओच्या माध्यमातून PM मोदींनी वैज्ञानिकांना प्रोत्साहन दिलं आहे. आपल्या एक्स हँडलवरुन पंतप्रधानांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.

"आमचं सरकार लहान मुले आणि तरुणांमध्ये रिसर्च अँड इनोव्हेशनला चालना देण्यासाठी सातत्याने काम करत आहे. विकसित भारताचं आपलं स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी हे महत्त्वाचं आहे", असं पंतप्रधानांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

थोर भारतीय वैज्ञानिक सी.व्ही. रामन यांनी प्रकाशाच्या विकिरणाबद्दल संशोधन केलं होतं. त्यांनी लावलेल्या शोधाला 'रामन इफेक्ट' म्हणून ओळखलं जातं. याच शोधासाठी त्यांना विज्ञान क्षेत्रातील सर्वोच्च समजला जाणारा नोबेल पुरस्कार देखील मिळाला होता. त्यांच्या सन्मानार्थ आजचा दिवस हा राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो.

विकसित भारतासाठी..

यावर्षीच्या विज्ञान दिनाची थीम ही 'विकसित भारतासाठी स्वदेशी तंत्रज्ञान' अशी आहे. मोदी सरकारच्या मेक इन इंडिया अभियानाअंतर्गत जगभरातील कित्येक कंपन्या सध्या भारतात येत आहेत. कित्येक इलेक्ट्रॉनिक गोष्टींचं उत्पादन सध्या भारतातच सुरू आहे. स्मार्टफोन, लॅपटॉप अशा गोष्टींसोबतच सेमीकंडक्टर आणि उपग्रह देखील भारतात तयार करण्यासाठी विदेशी कंपन्या उत्सुक आहेत. काही दिवसांपूर्वीच सरकारने अंतराळ संशोधन क्षेत्रासाठी देखील 100 टक्के FDI ला परवानगी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG ग्राहकांना मोठा दिलासा! २० हजार टन एलपीजी घेऊन जहाज भारतात दाखल, गॅस पुरवठ्याचं टेन्शन कमी होणार

'तुला मुलीच होतात, मुलगा नाही...'; म्हणत पतीनं पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड टाकलं; पुण्यातील धक्कादायक घटना

Devendra Fadnavis: कर्करोग उपचार खर्च कमी होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पुण्यात पीपीपी तत्त्वावर नवे मेडिकल सेंटर सुरू!

बुंडिबुग्यो व्हायरस, इबोलाच्या साथीचा उद्रेक; ८८ जणांच्या मृत्यूनंतर WHOने जाहीर केली ग्लोबल हेल्थ इमर्जन्सी

Anand Paranjpe Sharad Pawar Meeting : पक्ष प्रवेश एकनाथ शिंदेंच्या पक्षात, भेट घेतली शरद पवारांची; ठाणेकर आनंद परांजपेंच्या भेटीने चर्चांणा उधाण

SCROLL FOR NEXT