Pokemon Go Hindi eSakal
विज्ञान-तंत्र

Pokemon GO Hindi : आता हिंदीमध्ये खेळता येणार 'पोकेमॉन गो' मोबाईल गेम; भारतातील यूजर्स वाढवण्यासाठी मोठा निर्णय

Pokemon India : या गेममध्ये असलेल्या सर्व सूचना आणि अगदी पोकेमॉनची नावं देखील हिंदीमध्ये असणार आहेत.

Sudesh

जगभरात प्रसिद्ध असणारी पोकेमॉन गो गेम आता भारतात हिंदीमध्ये लाँच झाली आहे. भारतात या गेम्सचे यूजर्स वाढवण्यासाठी निअ‍ॅन्टिक कंपनीने हा निर्णय घेतला आहे. यामुळे ही गेम आता इंग्रजीसह हिंदी भाषेलाही सपोर्ट करेल.

Pokemon GO हे अ‍ॅप गुगल प्ले स्टोअर आणि अ‍ॅपलच्या अ‍ॅप स्टोअरवर उपलब्ध आहे. हिंदी ही आशियातील सहावी सर्वाधिक वापरली जाणारी भाषा आहे, तर जगातील 15व्या क्रमांकाची वापरली जाणारी ही भाषा आहे. यामुळेच गेमचे यूजर्स वाढवण्यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला आहे.

या गेममध्ये असलेल्या सर्व सूचना आणि अगदी पोकेमॉनची नावं देखील हिंदीमध्ये असणार आहेत. सर्व 800 लोकप्रिय पोकेमॉन्सची नावं हिंदीमध्ये करण्यात येणार असल्याचं निअ‍ॅन्टिकने स्पष्ट केलं आहे.

भारतात वाढवणार टीम

कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं, की भारतात आपली टीम वाढवण्यासाठी निअ‍ॅन्टिक प्रयत्न करत आहे. हिंदी ही केवळ सुरूवात आहे. भविष्यात आणखी भारतीय भाषांमध्ये देखील ही गेम उपलब्ध करण्याचा विचार कंपनी करू शकते.

शॉर्टफिल्मही रिलीज

या वेळी 'जर्नी ऑफ वन ड्रीम' ही पोकेमॉनवर आधारित शॉर्ट फिल्मही रिलीज करण्यात आली. ही शॉर्ट फिल्म हिंदी, तेलुगू आणि बंगाली भाषांमध्ये उपलब्ध करण्यात आली आहे. पोकेमॉन एशिया या पोकेमॉनच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर ही फिल्म उपलब्ध आहे.

दिल्लीमध्ये पोकेमॉन फेअर

18 आणि 19 सप्टेंबर रोजी दिल्लीमध्ये पोकेमॉन फेअरचं आयोजन करण्यात आलं आहे. मॉल ऑफ इंडियामध्ये ही पोकेमॉन जत्रा पार पडेल. याठिकाणी लहान मुलांना पोकेमॉनबद्दल माहिती दिली जाईल. तसंच, मुलं कित्येक मर्चंडाईज देखील खरेदी करू शकणार आहेत. यासोबतच मुलांना या गेमचीही माहिती दिली जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

SCROLL FOR NEXT